Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Drunk tourists in Goa: घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.या संदर्भात कळंगुट पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट : कांदोळी किनाऱ्यावर सोमवारी पहाटे घडलेल्या तोडफोडीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मद्यधुंद अवस्थेत बंगळुरू येथील काही पर्यटकांनी किनाऱ्याजवळ पार्क करण्यात आलेल्या दहा दुचाक्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकारामुळे किनाऱ्यावर उभे असलेले स्थानिक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. काही पर्यटकांनी यावेळी धुडगूस घालत, दगडफेक करून दुचाक्यांना नुकसान पोहोचवले.

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.या संदर्भात कळंगुट पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू करताच जवळच्या एका हॉटेलमध्ये उतरलेल्या बंगळुरू येथील पाच संशयित पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Goa Crime News
Rama Kankonkar Assault: अट्टल गुन्‍हेगार जेनिटोच्‍या मुसक्‍या आवळल्‍या, संशयितांना दिली होती हल्ल्याची सुपारी; चौकशीअंती 'मास्‍टरमाईंड' येणार समोर

त्यांच्याकडून चौकशी सुरू असून, मद्यप्राशन केल्यानंतर त्यांनी ही तोडफोड केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पर्यटकांच्या मद्यधुंद वर्तनामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.

Goa Crime News
Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसोबतच स्थानिकांच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com