कार्लुस आल्मेदांचा भाजप सरकार विरोधात गौप्यस्फोट

भाजपने सरकारी नोकऱ्या विकून एका प्रकारे भ्रष्टाचार माजविला आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत..
BJP in Carlos Almeida
BJP in Carlos AlmeidaDainik Gomantak
Published on
Updated on

स्व. मनोहर पर्रीकर यांची तत्त्वे न पाळणारा विद्यमान भाजप असल्याची तीव्र प्रतिक्रिया माजी आमदार तथा वास्को काँग्रेसचे उमेदवार कार्लुस आल्मेदा यांनी दिली. वास्कोत विकास कामांना राज्य भाजप सरकारने मला योग्य प्रकारे सहकार्य न केल्याने अनेक प्रकल्पाची कामे होऊ शकली नसल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार (MLA) आल्मेदा यांनी केला.

गोवा प्रदेश काँग्रेस वास्कोचे उमेदवार तथा माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सोमवार (दि.24) येथील ग्रामदेव दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या समवेत मुरगाव नगर सेविका देविता आरोलकर, श्रद्धा महाले, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, फेड्रिक हेंन्रीक, नारायण बोरकर, माजी नगरसेवक धनपाल स्वामी, सौ. जेनिफर आल्मेदा, साजिद खान, संदीप नार्वेकर, मनीष ठक्कर, शलाका कांबळी, सुजिता ठक्कर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BJP in Carlos Almeida
पर्येत सासरे, सून आमने-सामने, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊनही...

पुढे बोलताना वास्को काँग्रेसचे (Congress) उमेदवार कार्लुस म्हणाले की भाजपने सरकारी नोकऱ्या विकून एका प्रकारे भ्रष्टाचार माजविला आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर नसताना भाजपने माझ्यावर सदैव अन्याय केला असल्याची माहिती कार्लुस आल्मेदा यांनी दिली. वास्को दामोदर सप्ताहात भ्रष्टाचार करणाऱ्यांना विद्यमान भाजप (BJP) पक्षश्रेष्ठी ने उमेदवारी देऊन एका प्रकारे या पक्षात स्व. मनोहर पर्रीकर यांचे विचार बाजूला ठेवले आहे. सर्व धर्मीयांना घेऊन जाण्याची क्षमता भाजपमध्ये फक्त स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे होती अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार आल्मेदा यांनी दिली.

BJP in Carlos Almeida
अमित पालेकरांनी केला नीलेश काब्रालांच्या संपत्तीचा पर्दाफाश

वास्को (Vasco) ग्रामदेव चरणी श्रीफळ अर्पण करून काँग्रेस उमेदवार कार्लुस आल्मेदा यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना नगरसेवक यातिन कामुर्लेकर म्हणाले की भाजप सरकारने सरकारी नोकऱ्यांचा भ्रष्टाचार करून शिक्षित युवकांवर अन्याय केला आहे. आल्मेदा यांच्या विकास कामांना अडथळा निर्माण करण्यात राज्य सरकार जबाबदार असल्याची माहिती कामुर्ले कर यांनी दिली. कार्लुस आल्मेदा यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याने वास्कोत पुन्हा एकदा काँग्रेस चमत्कार घडविणार असल्याची माहिती समाजसेवक संदीप नार्वेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com