Goa IIT Project: कोडारचा विषय निकाली! ढवळीकर यांच्‍या मागणीनुसार आयआयटी प्रकल्‍प फर्मागुढीत साकारणार का?

Codar IIT Project: आयआयटी प्रकल्‍प कोडारमध्‍ये न उभारण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतल्‍याची माहिती शिरोड्याचे आमदार तथा जलसंपदा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्‍थानिक जनता आणि विरोधी पक्षांनी गेल्‍या काही दिवसांपासून सुरू केलेल्‍या तीव्र विरोधामुळे आयआयटी प्रकल्‍प कोडारमध्‍ये न उभारण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतल्‍याची माहिती शिरोड्याचे आमदार तथा जलसंपदा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्‍या मागणीनुसार हा प्रकल्‍प सरकार फर्मागुढीत साकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पणजीतील पत्रकार परिषदेवेळी मंत्री शिरोडकर यांच्‍यासमवेत कोमुनिदाद समितीचे अध्‍यक्ष प्रशांत गावकर, सरपंच मधू खांडेपारकर आदी उपस्‍थित होते. शिरोडकर म्हणाले, की तांत्रिक शिक्षणाच्‍या दृष्‍टीने आयआयटी महत्त्‍वाची असते.

आयआयटीमुळे संशोधनासाठी पोषक वातावरण तयार होते. आयटी क्षेत्रातील कंपन्‍यांनाही असा प्रकल्‍प हवा असतो. त्‍यामुळेच हा प्रकल्‍प यावा, यासाठी प्रत्‍येक राज्‍याचे प्रयत्‍न सुरू असतात. त्‍याच दृष्‍टीने राज्‍य सरकारनेही आयआयटी प्रकल्‍प गोव्‍यात आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले होते. केंद्र सरकारनेही आयआयटी प्रकल्‍प गोव्‍यात उभारण्‍यास मान्‍यता दिली.

परंतु, गेल्‍या काही वर्षांत अनेक ठिकाणी या प्रकल्‍पाला विरोध झाला. दोन अभियांत्रिकी, दोन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे शैक्षणिक हब बनलेल्‍या फोंडा तालुक्‍यात हा प्रकल्‍प उभारल्‍यास त्‍याचा फायदा राज्‍यातील विद्यार्थ्यांना मिळेल. रोजगार निर्मितीसह संशोधनाला अधिक वाव मिळेल, या आशेने आम्ही हा प्रकल्‍प कोडारमध्‍ये आणण्‍याचे निश्‍चित केले होते, असे शिरोडकर म्हणाले.

आयआयटी प्रकल्‍पासाठी सरकारने यापूर्वी काणकोण, सांगे आणि शेळ-मेळावली येथील जागा निश्‍चित केल्‍या होत्‍या. परंतु, तेथील स्‍थानिकांच्‍या विरोधामुळे सरकारने त्‍या त्‍या जागांवरून प्रकल्‍प इतरत्र नेला. काही दिवसांपासून कोडार येथील कोमुनिदाद जमिनीवर हा प्रकल्‍प उभारण्‍याचे सरकारने ठरविले. पण, तेथील नागरिकांनीही प्रकल्‍पाविरोधात आंदोलन छेडले.

त्‍यामुळे आता कोडारमध्‍येही प्रकल्‍प न उभारण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुसरीकडे, वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी हा प्रकल्‍प फर्मागुढीत आल्‍यास स्‍वागत असेल, असे वक्तव्‍य काही दिवसांपूर्वी केले होते. त्‍यांनी यापूर्वीही हा प्रकल्‍प फर्मागुढीतच उभारावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्‍यामुळे कोडारचा विषय निकाली निघाल्‍याने सरकार हा प्रकल्‍प फर्मागुढीत साकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

...रोजगार संधींना कोडारवासीय मुकले

१आयआयटी प्रकल्‍पासाठी दहा लाख चौरस मीटर जमिनीची आवश्‍‍यकता होती. कोडारमधील ज्‍या जागेत हा प्रकल्‍प आणण्‍याचा विचार सरकारने केला होता, ती जमीन १९ लाख चौरस मीटर इतकी आहे.

२ त्‍यापैकी चार ते पाच लाख चौरस मीटर जमिनीच्‍या सनद तेथील स्‍थानिकांना दिल्‍या आहेत. उर्वरित जमिनीपैकी दहा लाख चौरस मीटरमध्‍ये हा प्रकल्‍प उभारण्‍याचे सरकारने ठरवले होते.

३परंतु, कोडार येथील काहीजणांनी या प्रकल्‍पास विरोध दर्शवला. त्‍यांनी सहकार्य केले असते, तर कोडारमधील लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या, असेही मंत्री शिरोडकर म्‍हणाले.

Sudin Dhavalikar
Kodaar IIT Project Cancelled: 'लोकांक आयआयटी नाका, आमका लोकांआड वचपाचे ना', कोडार IIT प्रकल्प अखेर रद्द; मंत्री शिरोडकरांची घोषणा

मुख्यमंत्रीही लोकांसोबत

काही लोकांनी कोडार येथे आयआयटी प्रकल्‍पाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविल्‍यामुळे मी याप्रश्‍नी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याशी चर्चा केली. लोकांचा विरोध असेल, तर आयआयटी प्रकल्‍प कोडारमध्‍ये नको, अशी भूमिका मुख्‍यमंत्र्यांनी घेतल्‍याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

Sudin Dhavalikar
Goa IIT Project: 'आयआयटी’ला फर्मागुढीत चांगली जागा, ढवळीकरांचे प्रतिपादन; पर्रीकरांशीही बोलल्याची करुन दिली आठवण

आता ढवळीकरांची लागणार कसाेटी

फर्मागुढी हे विविध महाविद्यालयांचे शैक्षणिक ‘हब’ असून या ठिकाणी आयआयटी उभारणे शक्य आहे. ही माझी सरकारकडे मागणी नसून विनंती आहे, असे सांगतानाच फर्मागुढीत साधारण ११ लाख चौरस मीटर जमीन आहे. त्यामुळे ५ लाख चौरस मीटर जमीन घेऊन १० लाखांचा ‘एफएआर’ करून जागा संपादित करण्याबरोबरच आयआयटी प्रकल्प व्हर्टिकल उभारावा, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com