Manohar International Airport: टॅक्‍सीचालकांकडून अर्जांची होळी

प्रकरण तापले : टॅक्‍सीचालकांची पेडणे वाहतूक कार्यालयावर धडक
Taxi | Manohar International Airport
Taxi | Manohar International Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Manohar International Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी स्टॅंडसाठी उत्‍सुक टॅक्सीचालकांना पेडणे वाहतूक कार्यालयाने टॅक्सी नोंदणीसाठी अर्ज दिले होते. टॅक्‍सीचालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली या चालकांनी काल संध्याकाळी पेडणे वाहतूक कार्यालयात जाऊन वाहतूक अधिकारी कमलाकांत कारापूरकर यांना जाब विचारला व दिलेल्या अर्जांची होळी केली.

यावेळी ताम्हणकर म्‍हणाले की, 1/14 चा उतारा वगैरेची अट कायद्यात आहे तर आम्हाला दाखवून द्या. टॅक्सी स्टॅंडसाठी या विमानतळावर जागा नाही वगैरे सांगण्याचा अधिकार विमानतळ मुख्य अधिकाऱ्याला नाही तर तो स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांना आहे.

Taxi | Manohar International Airport
Goa Crime News: अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

तुम्ही तो हक्क वापरत नसाल तर उत्‍सुक टॅक्सीचालकांना अर्जही देऊ नका. स्थानिक वाहतूक कार्यालयास जर विमानतळ अधिकारी आपले हक्क बजावू देत नाहीत तर विमानतळावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी अडवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तुमचे हक्क दाखावा, असे ताम्हणकर यांनी वाहतूक अधिकारी कारापूरकर यांना सांगितले.

दरम्‍यान, टॅक्सीचालक रुपेश कुंब्रलकर व गजानन गडेकर यांनी सरकारने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला.

Taxi | Manohar International Airport
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली?

आम्हाला कायदेशीर अर्ज द्या. ही आमची थट्टा आहे. हे सरकार ‘फोडा, तोडा आणि सत्ता करा’ या ब्रिटिश तत्वाप्रमाणे वागत आहे. वाहतूक कार्यालयाने मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर चालणाऱ्या बेकायदेशीर पर्यटन टॅक्सींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्ही या कार्यालयाला पुन्‍हा घेराव घालू व आंदोलन सुरू करू.- सुदीप ताम्‍हणकर, टॅक्‍सीचालक संघटनेचे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com