Govind Gaude: संघर्ष करणे ही काळाची गरज! मंत्री गोविंद गावडे

Goa Minister Govind Gaude: ‘उटा’च्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak

आपला इतिहास बदलायचा असेल,तर त्यासाठी क्रांती करावी लागते आणि क्रांतीसाठी इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. यासाठी समाजातील प्रत्येकाने शालेय शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.

शिकून संघटित होणे आणि त्यानंतर संघर्ष करणे, ही बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.

‘वाडा तेथे गांव’ या संकल्पने अंतर्गत मडगाव येथील एम. एम. हॉलमध्ये रविवारी ‘उटा’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते उद्‍घाटक या नात्याने बोलत होते.

सक्रिय आंदोलनामुळे काही प्रमाणात आमची स्थिती सुधारली आहे, पण येणाऱ्या पिढीसाठी समृद्धी निर्माण करण्याची गरज आहे. कोणीही एकटी व्यक्ती मोठे काम उभे करू शकत नाही, ते आम्ही सर्वांनी मिळून केले पाहिजे आणि त्यासाठीच ‘उटा’ सक्रियपणे कार्यरत आहे,असेही गावडे म्हणाले.

Govind Gaude
Goa Inquisition: गोव्यात शालेय अभ्यासक्रमात 'इन्क्विझिशन'चा इतिहास समाविष्ट करा; हिंदू जनजागृती समिती

सामाजिक कार्य करत असताना अनेक अडीअडचणी येतात. मानापमान सहन करावे लागतात. पण आपले कार्य प्रामाणिक असेल तर उशीर का होईना त्यालाही यश मिळतेच मिळते, असे माजी मंत्री व ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी सांगितले.

आदिवासी साठी कार्यरत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दुर्गादास गावडे यांनी दिली.

‘उटा’ तर्फे १६ डिसेंबर २००९ रोजी विधानसभेवर काढलेला मोर्चा आणि २५ मे २०११ रोजी बाळ्ळी येथे झालेल्या आंदोलनाचा आढावा गोमंतक गौड मराठा संस्थेचे अध्यक्ष विश्वास गावडे यांनी घेतला.

गांवच्या सामाजिक विकासासाठी संस्था महत्वाची आसते,असे रुमाल्डो गोन्साल्विस यांनी सांगितले. यावेळी पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप तसेच सुर्यकांत गावडे, सतीश वेळीप , उमेश गावकर, रोहिदास दिवाडकर, अनिल गांवकर,मोलु वेळीप, भालचंद्र उसगावकर, सुभाष कुट्टीकर, संदेश शिरोडकर,बाबु गांवकर, चंद्रकांत गांवकर उपस्थित होते.

२५ मे रोजी बाळ्ळी येथे झालेल्या आंदोलनाचा व्हीडिओ यावेळी दाखविण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. उदय गावकर यांनी केले. उमेश गावकर यांनी आभार मानले. मेळाव्याला सुमारे दोन हजार प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

‘उटा’तर्फे राज्यात अनेक उपक्रम सुरू झाले. पण या उपक्रमांमध्ये आमच्याच समाजातील काही लोक विघ्न संतोषी लोकांनी विघ्न आणले. या विघ्नसंतोषी लोकांमुळे समस्या उद्‍भवल्या आहेत,ही खंत आहे.

-वासु मेंग गांवकर,माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com