Rajbagh Accident: एकमेकांना धडकल्या 2 कार! भीषण अपघातात तिघे ठार; मृतांच्या कुटुंबीयांना 37 लाखांच्या भरपाईचा आदेश

Canacona Rajbagh Accident: दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली, नंतर न्यायाधीशांनी वरील निवाडा दिला.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

मडगाव: काणकोण तालुक्यातील राजबाग तारीर येथील अपघाती मृत्यू प्रकरणात मृतांच्या कुटुंबीयांना इन्शुरन्स कंपनीने नुकसान भरपाई म्हणून ३७.४९ लाख रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली, नंतर न्यायाधीशांनी वरील निवाडा दिला. ७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान हा दोन कारमध्ये धडक बसून अपघात घडला होता. यात उल्हास राम नागेकर (६४ ), त्याची पत्नी वीणा (६०) व मुलगा हरीश (३५) हे ठार झाले होते. मयत उपासनगर वास्को येथे रहात होते. ते मूळ माजाळी - कारवारयेथील होते.

Court Order, summons
Mumbai Goa Highway Accident: अंत्यविधीला जाताना काळाने गाठले; 100 फूट खोल नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

प्रतिवादी वाहनचालक प्रशांत तळेकर (४२, रा. कारवार), वाहनाच्या मालकीण स्नेहा कोठारकर (४५, रा. कारवार) व नॅशनल इन्शुरन्स कंपनी (कारवार शाखा) या तिघाही प्रतिवादींना दोषी ठरवून एकत्रितरित्या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी.

Court Order, summons
Porvorim Flyover Accident: चार कर्मचारी थोडक्यात बचावले; पर्वरीत उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळला, CM देणार स्पष्टीकरण

त्यात न्यायालयात खटला दाखल झाल्यापासून आजपर्यंत नुकसान भरपाईच्या रकमेवर ६ टक्के किमान व्याजही मृतांच्या कुटुंबीय हर्शिता नागेकर व तिची दोन वर्षांची मुलगी सैवी नागेकर यांना देण्यात यावी, असे न्यायाधीश पॉल यांनी आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com