Goa Drugs Case: अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला! काणकोण पोलिसांकडून 4.31 लाखांचे 'चरस' हस्तगत, 29 वर्षीय व्यक्ती अटकेत

Goa Drug Trafficking : काणकोण पोलिसांनी सोमवारी, १९ जानेवारी रोजी एका मोठ्या कारवाईत कोळंब येथील परिसरातून एका संशयित तस्कराला अटक केली.
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: राज्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काणकोण पोलिसांनी सोमवारी, १९ जानेवारी रोजी एका मोठ्या कारवाईत कोळंब येथील परिसरातून एका संशयित तस्कराला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ४.३१ लाख रुपये किमतीचे ४३१ ग्रॅम 'चरस' जप्त केले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला

काणकोण पोलिसांना कोळंब परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी या भागात सापळा रचला.

संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४३१ ग्रॅम चरस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Goa Drugs Case
Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा नोंदवला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी सील केला असून संशयिताला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

Goa Drugs Case
Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

अटक करण्यात आलेल्या संशयिताची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्याने हा अमली पदार्थाचा साठा कोठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय ड्रग्ज रॅकेटशी जुळलेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com