काणकोणमध्ये क्रांती! 'पंतप्रधान कुसूम' अंतर्गत 700 शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषिपंप; मंत्री ढवळीकरांची मोठी घोषणा

Solar Pumps for Farmers Goa: पंतप्रधान मोदी यांच्या सौर ऊर्जा घर या योजनेचा वापर करून काणकोण तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो
PM Kusum Scheme
PM Kusum SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोणची विजेची गरज फक्त २५ मेगावॅट आहे, पंतप्रधान मोदी यांच्या सौर ऊर्जा घर या योजनेचा वापर करून काणकोण तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

आजपर्यत पंतप्रधान कुसूम योजनेतून पाच लाख किंमतीचे १७० शेतकऱ्यांना पंप मोफत दिले आहेत यापुढे याच योजनेतून सातशे पंप राज्यभरातील शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती वीज मंत्र्यांनी दिली. आज भरड शेती परवडत नाही हे सत्य पंतप्रधानाही समजले आहे त्यासाठी ४ हजार चौमी. जमिनीत सोलर पॅनल बसवून सौर उर्जा निर्माण करू शकता ही वीज वीज खाते ३.७१ रूपयांत खरेदी करेल.

आज वास्को व अन्य ठिकाणी कोळशाचे प्रदूषण होत असल्याचे वादंग आहे. कोळसा हा औष्णिक उर्जा निर्मिती साठी आवश्यक आहे. कोळसा नको असल्यास सौर उर्जेचा उपयोग करा, असा सल्ला त्यांनी दिला. हा कार्यक्रम काणकोण येथील रवींद्र भवनात झाला.

वीज खात्याचे सचिव अधिकारी प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले,की काणकोण तालुक्याला संपूर्णपणे सौर उर्जा आधारित तालुका बनण्याची संधी पंतप्रधान सूर्य घर योजनेतून प्राप्त झाली आहे. यावेळी पंतप्रधान सूर्य घर व पंतप्रधान कुसूम या योजनेच्या लाभार्थ्यांना संमती पत्रे वीज मंत्री व कला संस्कृती मंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. त्यात शांता देसाई, प्रमोद गांवकर ,किरण देसाई, रमाकांत नाईक गावकर संजय देसाई,अरूंधती नाईक गावकर,कासा जाली विलास पावस्कर,आरती अजय भगत यांचा समावेश होता.

PM Kusum Scheme
Solar Ferryboat: सौर फेरीबोट कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरु, 2 खासगी कंपन्यांशी प्राथमिक वाटाघाटी

यावेळी वीज खात्याचे अधीक्षक अभियंता राजीव सावंत,गौरेश पिळर्णकर, उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर,सेवा संकल्पच्या डॉ.अनिता तिळवे, सेवा संकल्प चे अध्यक्ष बांबू कोमरपंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोलये येथील कन्या वसतीगृहातील सौर उर्जा प्रकल्पाचे औपचारिक उद्‍घाटन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कन्या वसतिगृहाला पीएम सूर्यघर अंतर्गत सोलर रुफ टॉप पॅनल देण्यात आले आहे.सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले. पिळर्णकर यांनी आभार मानले.

२०० कोटी खर्चून भूमिगत वीजवाहिन्या!

आतापर्यंत काणकोण तालुक्यातील बहुतांश भाग दोनशे कोटी रुपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे जोडण्यात आला आहे. आता किनारी भागात एलटी लाईन बदलून त्या भागात भूमिगत वीज वाहिनी घालण्याची गरज आहे. त्यासाठी शंभर कोटी खर्च अपेक्षित आहे. वीज खात्याचे काणकोण मधील सहाय्यक अभियंता गोविंद भट व अन्य सहकारी अभियंते यांचे सहकार्य लाभत आहे. यापुढे सौर उर्जेशिवाय पर्याय राहणार नाही,असे कला व संस्कृती मंत्री डॉ.रमेश तवडकर यांनी ठासून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com