Solar Ferryboat: सौर फेरीबोट कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरु, 2 खासगी कंपन्यांशी प्राथमिक वाटाघाटी

Solar Ferryboat Goa: गोव्यात पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर जलवाहतूक साधन म्हणून सौर फेरीबोट वापरात आणण्याचे प्रयत्न नदी परिवहन खात्याने पुन्हा एकदा सुरू केले आहेत.
Solar Ferryboat Goa Sale
Solar Ferryboat Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर जलवाहतूक साधन म्हणून सौर फेरीबोट वापरात आणण्याचे प्रयत्न नदी परिवहन खात्याने पुन्हा एकदा सुरू केले आहेत. सध्या वापरात नसलेली ही सौरचालित फेरीबोट पुन्हा कार्यरत करण्यासाठी विभागाने दोन खासगी कंपन्यांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.

गोव्यातील ही सौर फेरीबोट केरळमध्ये सौर बोट सेवेसंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यानंतर बांधण्यात आली होती. तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज असलेल्या या बोटीमध्ये सौर पॅनलच्या साहाय्याने चालणारे इंजिन असून ती पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या फेरीबोटींपेक्षा अधिक शांत, प्रदूषणमुक्त आणि देखभाल खर्च कमी असलेली आहे. नदी परिवहन खात्याच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, “सौर फेरीबोटीच्या ऑपरेशन्ससाठी दोन नामवंत कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत.

Solar Ferryboat Goa Sale
Solar Ferryboat: सौर फेरीबोटीसाठी 2 कंपन्या इच्छुक! निविदेला 14 मेपर्यंत मुदतवाढ

हरित प्रवासाला मिळेल बळकटी

गोव्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही सौर फेरीबोट एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ही सेवा सुरू झाल्यास पर्यटकांसाठी नवी अनुभवात्मक सवारी तर मिळेलच, शिवाय गोव्याच्या हरित प्रवासाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यात सध्या अनेक जलमार्गांवर पारंपरिक फेरीबोटी मोफत सेवा पुरवत आहेत, परंतु भविष्यात सौर फेरीबोट वापरात आणल्यास त्याचा आर्थिक, पर्यावरणीय आणि तांत्रिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

Solar Ferryboat Goa Sale
Solar Ferry Boat: 3.9 कोटी खर्चून आणलेली, एकही दिवस न वापरलेली सौरफेरीबोट सरकार देणार चालवायला, एकाच कंपनीने दाखवला रस

प्रवासी क्षमता ७५

ही फेरीबोट ७५ प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असून प्रारंभी तिची चाचणी यशस्वी झाली होती. मात्र, नंतर ती विविध तांत्रिक व प्रशासनिक कारणांमुळे नियमित सेवेत आणता आली नाही. आता हरित ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने ही फेरीबोट पुन्हा सेवेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com