Canacona School Bus Fire: काणकोणात स्कूलबसला भीषण आग! बस संपूर्णपणे भस्मभात; सुदैवाने जीवितहानी टळली

Canacona school bus fire: काणकोण तालुक्यातील दापोळे येथील एस. एस. अँगल हायर सेकंडरी स्कूलची शाळा बस गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
Canacona school bus fire
Canacona school bus fireDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण तालुक्यातील दापोळे येथील एस. एस. अँगल हायर सेकंडरी स्कूलची शाळा बस गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

सदर बस ही शाळेच्या आवारात, राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या लगत उभी करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींनी बसला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ काणकोण अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि बस संपूर्णपणे ज्वाळांनी वेढली गेली.

चापोळी येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत बस जवळजवळ पूर्णपणे जळून राख झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि परिसरात आगीचा फैलाव होऊ दिला नाही.

Canacona school bus fire
Goa Nightclub Fire: 'बर्च क्‍लब' आग प्रकरणाची धग वाढली! आणखी तिघे स्‍कॅनरखाली; अबकारी, अग्निशमनच्‍या अधिकाऱ्यांना नोटिसा

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण घटना रात्रीच्या वेळी घडली आणि बसमध्ये कोणीही उपस्थित नव्हते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com