काणकोण येथील अंकिताच्या मृतदेहावर आढळल्‍या जखमा; संशय बळावला

मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
At Canacona discovery of wounds on Ankita's body raised suspicions
At Canacona discovery of wounds on Ankita's body raised suspicionsDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : तामणे-लोलये येथे घडलेल्‍या मायलेकीच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूप्रकरणाने काणकोण नव्‍हे तर संपूर्ण राज्‍याला हादरवून सोडले आहे. मुलगी अंकिता प्रकाश पोळजी हिच्या मृतदेहाची चिकित्सा आज बुधवारी मडगावच्‍या हॉस्पिसियो हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. हा अहवाल दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत अंकिताच्‍या मृतदेहावर काही जखमा व ओरबडल्‍याच्‍या खुणा सापडल्‍या आहेत. त्यामुळे तिच्या मृत्यू (Death) प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

At Canacona discovery of wounds on Ankita's body raised suspicions
केपे पालिकेत सत्ता बदलण्यासाठी काँग्रेस आमदारांचे प्रयत्न

काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांच्यामार्फत या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा जतन करून पुढील तपासासाठी तो हैदराबाद येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काणकोण पोलिस (police) स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यांनी सांगितले. अंकिताचे लग्न होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे.

At Canacona discovery of wounds on Ankita's body raised suspicions
पोलीस चौकीत सुरू होती दारूची पार्टी, व्हिडिओ व्हायरल

लग्न होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. विवाहानंतर सात वर्षांपूर्वी विवाहितेचा मृत्यू झाल्यास तिच्या मृत्यूची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आता काणकोणचे (Canacona) उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई यांच्या मार्फत चौकशी होणार आहे.

प्राथमिक माहिती प्रमाणे अंकीताचा मृत्यू बुडून झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, तिच्या अंगावर काही जखमा असल्याचे उघडकीस आले आहे. व्हिसेराची तपासणी झाल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com