Khola Chilli: खोला मिरची होणार ‘तिखट’! मान्सूनोत्तर पावसाचा परिणाम; यंदा दर वाढण्याची शक्यता

Goa Khola Mirchi: काणकोणची ‘खोला’ मिरची प्रसिद्ध आहे. या मिरचीवर यंदा मान्सूनोत्तर पावसाचा परिणाम झाला असून यंदा मिरचीचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
Khola Chilly
Khola ChilliDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : काणकोणची ‘खोला’ मिरची प्रसिद्ध आहे. या मिरचीवर यंदा मान्सूनोत्तर पावसाचा परिणाम झाला असून यंदा मिरचीचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मिरचीचे दर एक हजार प्रतिकिलो असे होते. यंदा मात्र, उत्पादन कमी असल्याने दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

खोला किंवा काणकोण मिरची तिच्या लाल रंगासाठी प्रचलित असून यंदा काढणीच्या काळात म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण व पावसामुळे मिरची वाळविण्यासाठी अडचणी येत आहेत.

जुलै महिन्यात रोपट्याची माळरानावर लागवड केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मिरच्या धरू लागतात. त्याची दिवसाआड काढणी करून त्या उन्हात वाळवल्या जातात. चतुर्थी व नंतरच्या काळात ढगाळ वातावरण पाऊस पडल्यामुळे काढणी केलेल्या मिरच्या वाळविणे कठीण झाले. त्यामुळे त्यांचा रंग पांढरट फिकट पडत आहे. गेल्या वर्षी खोला मिरचीचा दर एक हजार प्रती किलो होता. खराब मोसमामुळे हा दर आठशे रूपयांवरून एक हजार प्रती किलोपर्यंत गेला होता.

सध्या म्हापसा मिरची प्रति किलो सहाशे रूपये दराने विकण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी या मिरचीचा दर प्रति किलो तीनशे ते चारशे रूपये होता, गुंटूर व शेपडा मिरचीचा दर दीडशे ते दोनशे रूपये प्रति किलो होता. मात्र आज बाजारात या मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचप्रमाणे पोरसांच्या मिरचीचे दर प्रति किलो एक हजार रूपये झाला आहे. राज्यात मिरची पिकाचे दर ठरविणारी यंत्रणा नाही. तसेच गोवा बागायतदार संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून खोला मिरची खरेदी करणे बंद केले आहे.

Khola Chilly
Khola Chilli: खोला मिरची उत्पादनाचा हक्क फक्त आदिवासी समुदायाला; शेतकरी प्राधिकरणचा निर्णय

खोला, गावडोंगरीत उत्पादन

२०२० मध्ये खोला मिरचीला भौगोलिक नामांकन मिळाले होते. खोलाच्या डोंगराळ भागात ही मिरची पावसाळ्यात पिकवली जाते. त्याशिवाय काणकोण मधील गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ या भागातील डोंगराळ भागातही मिरचीचे पीक घेतले जाते, ती काणकोण मिरची म्हणून प्रसिद्ध आहे. या मिरचीचा रंग लालसर असून त्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते.

Khola Chilly
Goa News: मानांकन मिळालेली 'खोला मिरची' झाली तिखट

उन्हाळ्यात एप्रिल- मे महिन्यात मिरचीची रोपवाटीका तयार करण्यापासून पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर या मिरचीची लागवड केली जाते. त्यानंतर पाला पाचोळा यांचे आच्छादन घालणे यासारख्या प्रक्रिया कराव्या लागतात. मिरची धरू लागल्यानंतर त्या पिकल्यानंतर उन्हात वाळवणे ही प्रक्रिया करावी लागते. त्याशिवाय वन्यप्राणी, पक्षी यापासून त्याचे रक्षण करावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com