Canacona Agriculture : खाजन शेती बुजवून विकास; ‘सीझेडएमए’कडून पाहणी

Canacona Agriculture : याबाबतची माहिती रेनबो वॉरियर्सचे प्रमुख अभिजित प्रभू देसाई यांनी मागदाळ येथे स्थानिकांच्या उपस्थितीत दिली.
Canacona
Canacona Dainik Gomantak

Canacona Agriculture :

काणकोण, पैंगीण पंचायत क्षेत्रातील मागदाळ- गालजीबाग येथील खाजन जमीन बुजवून विकासकामे करण्यात येतात, याची किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण(सीझेडएमए)च्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पाहणी केली.

याबाबतची माहिती रेनबो वॉरियर्सचे प्रमुख अभिजित प्रभू देसाई यांनी मागदाळ येथे स्थानिकांच्या उपस्थितीत दिली. किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी ही पाहणी केली. पाहणीचा अहवाल अधिकारी वरिष्ठांना सादर करणार आहेत.यापूर्वी स्थानिकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर खाजन जमीन बुजवली जात असल्याचे कळवण्याचा प्रयत्न केला होता.

Canacona
South Goa Election 2024 Results Live: दक्षिणेत EVM च्या मतमोजणीस सुरुवात

मात्र त्याची दखल कोणत्याच सरकारी यंत्रणेने घेतली नाही. त्यासाठी रेनबो वॉरियर्स संघटनेने प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.

एका बड्या परप्रांतीय धनाढ्याकडून येथे मोठा विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. खाजन जमीन मातीचा भराव घालून बुजविल्यामुळे मागदाळ,काटेबाग,गालजीबाग येथे पावसाळ्यात पूराची शक्यता आहे, असे प्रभू देसाई यांनी सांगितले. त्यावेळी ती कृत्रिम आपत्ती ठरणार आहे. यावेळी स्थानिक डायगो डिसिल्वा, राजू पागी, सेबी बार्रेटो, डायना तावारीस, डेनिस फर्नांडिस, जुडास बार्रेटो व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com