South Goa Lok Sabha Election 2024 Results Live: विरियातोंनी गड राखला, धेंपेंच्या पदरी निराशा

South Goa Election 2024 Results Live News and in Marathi | Pallavi Dempo VS Viriato Fernandes VS Rubert Pereira | दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे, विरियातो फर्नांडिस आणि रुबर्ट परेरा यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
South Goa Election 2024 Results Live: दक्षिणेत विरियातो नऊ हजार मतांनी आघाडीवर
South Goa Loksabha Election 2024 Constituency Wise Result, Live and Winner News in MarathiDainik Gomantak

Digambar Kamat: जनतेच्या निर्णयाचा आदर - दिगंबर कामत

दक्षिण गोव्यात माझ्या अंदाजानुसार भाजपला 25 हजार मताच्या आघाडीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही, तरी आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो- दिगंबर कामत

Viriato Fernandes Won From South Goa: विरियातोंनी गड राखला, धेंपेंच्या पदरी निराशा

दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांचा 14,216 मतांनी विजय झाला असून, त्यांना 2,16,022 एवढी मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या पल्लवी धेंपे यांना 2,01,806 एवढी मते मिळाली आहेत.

विरियातो संसदेत गोव्याचा आवाज होतील- युरी आलेमाव

विरियातो फर्नांडिस संसदेत गोव्याचा आवाज होतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

विरियातोंचा दक्षिणेत विजयी जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुकशुकाट

दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिया याच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अद्याप औपचारिक घोषणा बाकी असली तरी विरियातोंचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते आनंदोत्सव साजरा करतायेत.

Viriato Fernandes: पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केला - विरियातो फर्नांडिस

आज पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केलाय, आजचा विजय मनी पावर विरोधात लोकांचा विजय असल्याचे विरियातो म्हणाले.

दक्षिणेत काँग्रेसचा विजयी जल्लोष, विरियातोंना 15,545 मतांची आघाडी

अद्याप अंतिम निकाल समोर आलेला नसला तरी काँग्रेसकडून दक्षिण गोव्यात विजयी जल्लोषाला सुरुवात केलीय. विरियातो यांना दक्षिण गोव्यात १५,५४५ मतांची आघाडी मिळाली आहे.

BJP Demand Recounting In South Goa: विरियातो विजयाच्या जवळ, भाजपने केली फेरमतमोजणीची मागणी

दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. दरम्यान, भाजपने दक्षिणेत फेरमतमोजणीची मागणी केलीय. विरियातो यांनी विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी समस्त गोंयकारांचे देखील आभार मानले आहेत.

दक्षिणेत मोदींनी सभा घेतली मात्र या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा मोदींचा नैतिक पराभव असल्याचा उल्लेख देखील विरियातो यांनी केला. मनी पॉवरचा पीपल पॉवरने पराभव केल्याचे विरियातो म्हणाले.

South Goa Counting: दक्षिणेत भाजपला मोठा धक्का बसणार? विरियातो विजयाच्या जवळ

दक्षिण गोव्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस विजयाच्या जवळ पोहोचताना दिसत आहेत. विरियातो पहिल्यापासून आघाडीवर आहेत, सध्याच्या घडीला त्यांना 20,950 मतांची आघाडी आहे.

Viriato Fernandes South Goa: विरियातोंची वीस हजारांची आघाडी कायम

सकाळी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी

विरियातो फर्नांडिस - 1,97,462 (+ 20532)

पल्लवी धेंपे - 1,76,930 ( -20532)

रुबर्ट परेरा - 16,469 ( -180993)

South Goa Pallavi Dempo: दक्षिणेत भाजपचा विजय होणार - विनय तेंडुलकर

दक्षिण भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे विजयी होतील, असा दावा माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे. दक्षिणेत सध्या लीड कमी असले तरी भाजप उमेदवार विजयी होईल, असे तेंडुलकर म्हणाले.

South Goa Voting Live: भाजपचा श्रीमंत उमेदवार पिछाडीवर, विरियातोंकडे 12 हजार मतांची आघाडी

सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी

विरियातो फर्नांडिस - 1,43,809 (+ 12249)

पल्लवी धेंपे - 1,31,560 ( -12249)

रुबर्ट परेरा - 12,094 ( -131715)

South Goa Third Round: दक्षिण गोव्यात टफ फाईट

दक्षिण गोव्यात सध्या पल्लवी धेंपे आणि विरियातो फर्नांडिस यांच्या टफ फाईट होताना दिसत आहे. तिसऱ्या फेरीनंतर विरियातो 12,527 मतांनी आघाडीवर आहेत.

South Goa Voting Live: दक्षिण गोव्यात काँग्रेसच 'कॅप्टन', वाचा तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी

तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी

विरियातो फर्नांडिस - 99,109 (+ 7724)

पल्लवी धेंपे - 91,385 (-7724)

रुबर्ट परेरा - 8962 (-90147)

Viriato Fernandes: दक्षिणेत विरियातो नऊ हजार मतांनी आघाडीवर

दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

South Goa Loksabha Election 2024 Results Live
South Goa Loksabha Election 2024 Results LiveDainik Gomantak

South Goa Counting: दक्षिण गोव्यात पोस्टल मतदानात विरियातो आघाडीवर, धेंपे पिछाडीवर

सांगे आणि शिरोड्यातून पल्लवी धेंपे आघाडीवर आहेत तर, कुडचडे आणि केपेत काँग्रेस आघाडीवर आहे.

South Goa Counting: दक्षिणेत EVM च्या मतमोजणीस सुरुवात

दक्षिण गोव्यात ईव्हिएमच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर साडे आठ वाजता EVM मतमोजणीस सुरुवात झालीय.

Digambar Kamat: दिगंबर कामत यांना अटक करा, काँग्रेसची मागणी

मतमोजणी केंद्रात अवैधपणे प्रवेश करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दिगंबर कामतांना अटक करा. दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबत आरओ आणि पोलिसांकडे तक्रार केलीय.

Vote Counting Begins In Goa: पोस्टल मतमोजणीस प्रारंभ

गोव्यातील दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून, सर्वप्रथम पोस्टल मते मोजली जाणार आहेत. साडे आठनंतर EVM ची मतमोजणी केली जाणार आहे.

Vote Counting In Begins Goa
Vote Counting In Goa BeginsDainik Gomantak

Pallavi Dempo News: दक्षिण गोव्यात धेंपे यांचा 25 हजार मतांनी विजय होईल

Dempo will win by 25k - Digambar Kamat

गोव्यात भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा 25 हजार मतांनी विजय होईल, असे मत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे.

Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

Viriato Fernandes And Pallavi Dempo: संविधानाचा मुद्दा चांगलाच गाजला

दक्षिण गोव्यातही अनेक मुद्दे गाजले. भाजपच्या महिला उमेदवार पल्लवी धेंपे आणि कॉंग्रेस उमेदवार विरीयातो फर्नांडिस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. पल्लवी धेंपे यांच्या संपत्तीचा मुद्दाही चांगलाच गाजला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पल्लवी धेंपे यांच्यासाठी प्रचारभा घेऊन लढत आणि चुरशीची बनवली. संविधान गोव्यावर लादल्यचा मुद्दा चांगलाच गाजला. विरीयातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला होता.

South Goa Congress Candidate Viriato Fernandes
South Goa Congress Candidate Viriato FernandesDainik Gomantak

South Goa Lok Sabha Counting Live: धेंपे, विरियातो की परेरा, दक्षिणेत कोण खासदार? आज ठरणार

भाजपने दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे (Pallavi Dempo) यांना निवडणुकीच्या मैदानात उरवले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने दक्षिण गोव्यातून विरीयातो फर्नांडिस (Viriato Fernandes) यांना मैदानात उतरवले आहे. दक्षिण गोव्यातील मतदार कुणाला विजयी करणार याचा फैसला थोड्याच वेळात कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com