Canacona: वय 65 वर्षेे; अजूनही पाडेलीचा उत्साह कायम

Canacona: पाडेली म्हणून काम करणारे बड्डे-खोतीगावातील सांगटू गावकर हे 65व्या वर्षीही दिवसातून किमान साठ माड चढून नारळाची काढणी करतात.
coconut tree
coconut treeDainik Gomantak

Canacona: काणकोण तालुका शेतीबरोबरच बागायतींसाठी प्रसिद्ध आहे. बागायती म्हटल्यावर नारळ, पोफळी, मिरी या गोष्टी आल्याच. पैंगीण, लोलये येथे गेली तीस वर्षे या भागात पाडेली म्हणून काम करणारे बड्डे-खोतीगावातील सांगटू गावकर हे 65व्या वर्षीही दिवसातून किमान साठ माड चढून नारळाची काढणी करतात.

परंपरेने पैगीण-लोलयेतील काही बागायतदारांची दर तीन महिन्यांनी नारळ काढणी होते. बड्डे खोतीगावात आपल्या वयाचे सहा पाडेली आहेत. मात्र, नवीन पिढी या व्यवसायात उतरू पाहत नाही. या व्यवसायात जोखीम आहे. पर्तगाळ येथील गोकर्ण-पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या वेगवेगळ्या भागातील बागायतीच्या नारळांची काढणी करण्यात येते.

40 नोंदणीकृत पाडेली

आतापर्यंत काणकोणात विभागीय कृषी खात्याकडे 40 नोंदणीकृत पाडेली आहेत. त्यामध्ये एकही महिला पाडेली नाही; परंतु आपल्या स्वतःच्या माडांवर चढून नारळ काढणाऱ्या काही महिला काणकोणात आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन या व्यवसायात सक्रिय करण्याचे प्रयत्न आहेत.

coconut tree
Mapusa: म्हापसा पालिका साबांखास देणार भाडेतत्त्वावर जागा

गावडोंगरी येथे कोची-केरळ येथील कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने कृषी खात्याने पाडेली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये वीस प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला आहे.- कीर्तीराज नाईक गावकर, विभागीय कृषी अधिकारी

काणकोणातील परंपरागत वाणाचे कवाथे जास्त काळ उत्पादन देतात. माडाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश, पाण्याच्या निचऱ्याची गरज आहे. त्याचमुळे गालजीबाग व अन्य जलस्त्रोत तसेच किनारी भागातील माड भरघोस नारळाचे उत्पादन देत असल्याचा पाडेली म्हणून अनुभव आहे. - सांगटू गावकर, पाडेली

पाडेलींची संख्या नगण्य : काणकोणात एकूण 1,800 हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीखाली आहे. त्यामुळे 40 पाडलींची संख्या नगण्य आहे. दर तीन महिन्यांनी नारळाची काढणी होते. त्यासाठी पाडेली मिळणे कठीण बनते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com