Mapusa: म्हापसा पालिका साबांखास देणार भाडेतत्त्वावर जागा

Mapusa: सर्वसाधारण बैठकीत एकमुखाने ठराव झाला आहे.
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mapusa: पालिका मंडळाने साबांखा विभागास म्हापसा केटीसी बसस्थानकावरील जागा भाडेतत्त्वावर देण्याचा एकमुखी ठराव घेतला. सध्या साबांखा रस्ता विभागाच्या कार्यालयाची दयनीय अवस्था झाल्याने या विभागाने पालिकेकडे भाड्याने जागा द्यावी, असा पत्रव्यवहार केला होता.

बुधवारी सायंकाळी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.

टुरिस्ट हॉटेलजवळील साबांखा रस्ता विभागाचे कार्यालय सध्या मोडकळीस आले असून तेथील छताचे स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडताहेत. त्यामुळे या विभागाने पालिकेस पत्र लिहून जागा भाडेपट्टीवर मागितली होती.

त्यासाठी केटीसी बसस्थानकाच्या आवारातील तिसऱ्या मजल्यावरील 100 चौरस मीटर जागा या विभागास भाड्यावर देण्याचे ठरले. मार्केट दरानुसार साबांखाकडून भाडे घेतले जाईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी पालिका मंडळास दिली.

Mapusa Municipality
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधन दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

शववाहिका घेणार

सध्या कनिष्ठ अभियंता, गवंडी, मार्केट निरीक्षकांची पालिकेकडे कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीवर या जागी कर्मचाऱ्यांना घेण्याचा ठराव घेतला. तसेच पालिकेकडे एकच शववाहिका असल्याने आणखी एक नवीन शववाहिका घेण्याचा ठराव, तसेच म्हापसा मार्केटचे काम हाती घेण्यासाठी लवकरच मार्केट प्रश्नावर विशेष बैठक घेतली जाणार, अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com