Sunburn Festival: कामुर्लीत ‘सनबर्न’ची डाळ शिजणार? पर्यटनमंत्र्यांचे कानावर हात

Camurlim: स्थानिक आक्रमकतेने सनबर्नला विरोध करत आहेत तर लोकप्रतिनिधींकडून सध्या सावध प्रतिक्रिया दिली जात आहे
Camurlim: स्थानिक आक्रमकतेने सनबर्नला विरोध करत आहेत तर लोकप्रतिनिधींकडून सध्या सावध प्रतिक्रिया दिली जात आहे
Goa Sunburn FestivalCanva
Published on
Updated on

म्हापसा: सनबर्न फेस्टिव्हलला उत्तर व दक्षिण गोव्यातून स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींकडूनही वाढता विरोध होत असतानाच, बार्देश तालुक्यातील कामुर्ली गावात सनबर्न महोत्सवासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. याविषयी कामुर्ली कोमुनिदादने निर्णय घेण्यासाठी ६ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे. मात्र, या बातमीमुळे कामुर्ली गावात या महोत्सवविषयी अस्वस्थता तसेच प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. स्थानिक आक्रमकतेने सनबर्नला विरोध करत आहेत. तर लोकप्रतिनिधींकडून सध्या सावध प्रतिक्रिया दिली जात आहे.

पर्यटनमंत्री अंधारात

कामुर्लीत सनबर्न महोत्सवासाठी हालचाली सुरू असल्याबाबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना विचारले असता, ‘याविषयी मला काहीच ठाऊक नाही’, असे ते म्हणाले. माजी सरपंच शरद गाड म्हणाले की, ज्यातून गैरप्रकारांना चालना मिळते, असे फेस्टिव्हल गावात नकोत.

Camurlim: स्थानिक आक्रमकतेने सनबर्नला विरोध करत आहेत तर लोकप्रतिनिधींकडून सध्या सावध प्रतिक्रिया दिली जात आहे
Sunburn Festival: ‘सनबर्न’साठी 'या' गावात जागेची मागणी! कोमुनिदादने बोलावली बैठक; सर्वांचे लक्ष 'गावकऱ्यांच्या' निर्णयाकडे

हळर्णकरही सजग

मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, सनबर्नला गोव्यात आता बरीच वर्षे झाली आहे. हा फेस्टिव्हल गोव्यासाठी नवीन नाही. सनबर्न कामुर्लीत येतोय की नाही, हे मला माहिती नाही. आता कामुर्लीतील लोक काय ठरवतात, हे पाहावे लागेल. तसेही हा महोत्सव वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये होतो. त्यामुळे आधीच यावर बोलणे किंवा टिप्पणी करणे योग्य होणार नाही.

अजून कशाचा काहीच थांगपत्ता नाही. त्यामुळे आधीच बोलणे किंवा प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. यावर भाष्य करणे म्हणजे, थोडे घाईचेच होईल.

सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com