Sunburn Festival: ‘सनबर्न’साठी 'या' गावात जागेची मागणी! कोमुनिदादने बोलावली बैठक; सर्वांचे लक्ष 'गावकऱ्यांच्या' निर्णयाकडे

Goa Sunburn 2024: कामुर्लीत या महोत्सवाविषयी नाराजी असून कोमुनिदादचे गावकरी याविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
Goa Sunburn 2024: कामुर्लीत या महोत्सवाविषयी नाराजी असून कोमुनिदादचे गावकरी याविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
Sunburn Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Festival To Be Held At Camurlim

पणजी: बार्देश तालुक्यातील कामुर्ली (Camurlim) येथे सनबर्न महोत्सवासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. कामुर्ली कोमुनिदादने याविषयी निर्णय घेण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बैठक बोलाविली आहे. मात्र, कामुर्लीत या महोत्सवाविषयी नाराजी असून कोमुनिदादचे गावकरी याविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दक्षिण गोव्यातील सत्ताधारी आमदार-मंत्र्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर दक्षिण गोव्यात सनबर्न होऊ देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. आयोजकांनी दक्षिण गोव्यात आयोजन करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण लागल्यावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा केली होती.

दक्षिणेत थारा नाहीच

सनबर्नच्या आयोजकांनी वेर्णा कोमुनिदादची (Comunidade) जागा पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता. लोटली गावच्या विशेष ग्रामसभेत सनबर्न विषयावर चर्चा होणार होती. त्यात सनबर्नला परवानगी दिली जाईल, अशी वातावरण निर्मिती केली होती. मात्र, सनबर्नला विरोध करण्यात आला.

रेजिनाल्डकडून प्रतिकार

औद्योगिक विकास महामंडळाच्या वेर्णा येथील जागेत सनबर्नसाठी अर्ज केला होता. जनतेचा रोष पाहून महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सनबर्न नकोच, अशी भूमिका घेतली. त्यानंतर महामंडळ संचालकांच्या बैठकीत जागा भाडेपट्टीवर देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

Goa Sunburn 2024: कामुर्लीत या महोत्सवाविषयी नाराजी असून कोमुनिदादचे गावकरी याविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
Sunburn Festival: संगीत, नृत्य ही गोव्याची संस्कृती! मग विरोध का? माजी मंत्री आजगावकर

विषय सूचीवर बेमालूमपणे आणला महोत्सव

१)आता सनबर्नच्या आयोजकांनी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांच्या माध्यमातून संगीत महोत्सवासाठी कामुर्ली कोमुनिदादची जागा भाडेपट्टीवर मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. तो अर्ज प्रशासकांच्या कार्यालयातून १२ सप्टेंबर रोजी कामुर्ली कोमुनिदादच्या कार्यालयात पोचला आहे.

२) त्यामुळे कोमुनिदादच्या लिपिक मनुजा पार्सेकर यांनी बोलाविलेल्या बैठकीच्या विषय सूचीवर दुसऱ्या क्रमांकावर हा विषय नोंदविला आहे. केवळ याच विषयासाठी ही बैठक बोलावली, असे वाटू नये म्हणून गावकरांना दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्टीबाबत विचार करणे, असाही एक विषय बैठकीच्या विषय सूचीत समाविष्ट केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com