Campal News : कांपाल येथे राजस्थान ग्रामीण मेळा व विक्री प्रदर्शन

Campal News : हस्तकलेवर १० टक्के सवलत तर हातमागावर २० टक्के सूट ग्राहकांना दिली जात आहे. या ठिकाणी प्रवेश आणि पार्किंग मोफत आहे.
Campal
Campal Dainik Gomantak
Published on
Updated on

Campal News : पणजी, बाल भवन, कांपाल येथे उत्सव राजस्थान ग्रामीण मेळा व विक्री प्रदर्शनाला गुरुवार २१ रोजीपासून सुरवात झाली असून १ जानेवारीपर्यंत रोज स.१०.३० ते रात्री ८.३० या वेळेत खुला राहणार आहे.

भारताच्या पूर्वेकडील ग्रामीण कारागिरांना एकत्र आणणाऱ्या या प्रदर्शनात कापूस व रेशीम हातमाग, हस्तशिल्प, ओरिसा टाय आणि डाई, ड्रेस मटेरिअल, ओरिसा साड्या, पश्चिम बंगालच्या सुती साड्या असे बरेच काही उपलब्ध आहे.

हातमागाच्या विविध प्रकारांमध्ये ओरिसा साड्या, घागरा चोली, बेडशिट्स, सहारनपूर फर्निचर, लाकडी खेळणी, बंजारा पिशव्या, उत्तर प्रदेशातील ब्लू पेव्हिंग, कुर्जा पेव्हिंग, शरणपूर लाकूड कोरीव काम, संगमरवरी, कलाकृती, राजस्थान आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.

प्लेटिंग, लखनौ सिक्न कार्व्हिंग, राजस्थान आणि उत्तर प्रदेश बेड रग, कलमकारी साड्या आणि फॅब्रिकस, कुर्ते, बंगाली शुद्ध कॉटनचे कपडे आणि साड्या, मुलमुल, चंदेरी, पश्चिम बंगाल, मदुराई सुंगुडी, लेडीज टॉप्स आदी उपलब्ध आहेत.

राजस्थानचे हस्तनिर्मित दागिने, कार्पेट्स, ड्युरी, मोजरी/जुटी, संगमरवरी कलाकुसर, हस्तिदंती, पेंटिंग्ज, ढाका येथील बिस्वजित साहा कल्पित ढाकई मलमल जमदानी साड्या उपलब्ध आहेत. प्रदर्शनात खरेदीवर भेटवस्तू दिल्या जात आहेत. हस्तकलेवर १० टक्के सवलत तर हातमागावर २० टक्के सूट ग्राहकांना दिली जात आहे. या ठिकाणी प्रवेश आणि पार्किंग मोफत आहे.

Campal
Goa Politics: मला राष्‍ट्रविरोधी ठरविणे पूर्णत: चुकीचे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com