Goa Politics: मला राष्‍ट्रविरोधी ठरविणे पूर्णत: चुकीचे

Goa Politics: चर्चिल आलेमाव : पोर्तुगीज पासपोर्टची सुविधा चांगली एवढेच मी म्‍हटले होते
Goa Politics:
Goa Politics:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: पोर्तुगालची मी कुठल्‍याही प्रकारे भलावण केलेली नाही. त्‍यामुळे मला राष्‍ट्रविरोधी ठरविण्‍याचा कुणालाही अधिकार नाही. मी फक्‍त पोर्तुगालमध्‍ये गोव्‍यातील लोकांना नागरिकत्‍व घेण्‍याची जी सोय उपलब्‍ध आहे, ती चांगली गोष्‍ट एवढेच म्‍हटले आहे.

Goa Politics:
CM Pramod Sawant: युवकांनी ड्रग्‍सच्‍या व्‍यवसायापासून दूर रहावे

राज्‍यातील वस्‍तुस्‍थिती तपासून पाहिल्‍यास ही गोष्‍ट शंभर टक्‍के खरी आहे, असे मत माजी मुख्‍यमंत्री आणि माजी खासदार चर्चिल आलेमाव यांनी व्‍यक्‍त केले. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

पोर्तुगीज पासपोर्ट मिळण्‍याची गोमंतकीयांची सवलत काढून घेतली तर हजारो जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. ही सवलत असल्‍यामुळेच लाखो गोमंतकीयांना आज युरोपची दारे उघडी होऊन त्‍यांच्‍या जीवनाला स्‍थैर्य आले आहे. ही सवलत नसती तर ते गोव्‍यात बेकारीतच खितपत पडले असते, असे चर्चिल यांनी ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतलेल्‍या मुलाखतीत सांगितले.

Goa Politics:
Pub House: एम. के. पब हाऊस कायमचे बंद करा; प्रस्ताव दाखल

गोवा मुक्तिदिनी म्‍हणजेच 19 डिसेंबरला समस्‍त गोमंतकीय भारतीय झेंड्याला मानवंदना देत असताना चर्चिल आलेमाव यांनी एका मुलाखतीत ‘आपण पोर्तुगाल राष्‍ट्राला सलाम ठोकतो’ असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर टीकेचा वर्षाव होत आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना चर्चिल म्‍हणाले, मी फक्‍त नागरिकत्‍व सवलत ठेवल्‍यामुळे पोर्तुगालला सलाम ठोकतो असे म्‍हटले होते. याचा अर्थ मी भारतीय तिरंग्‍याचा तिरस्‍कार करतो असे नव्‍हे. मात्र पोर्तुगीज पासपोर्टकडे फक्‍त भावनिकदृष्‍ट्या बघून चालणार नाही तर त्‍याकडे आर्थिक दृष्‍टीकोनातूनही पाहणे गरजेचे आहे. मी याबाबत मुख्‍यमंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच पंतप्रधानांना पत्र लिहून त्‍यांच्‍याकडेही मागणी करणार आहे, असे चर्चिल आलेमाव म्‍हणाले.

मते फोडण्‍यासाठी निवडणूक लढविणार नाही

आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा अजून मी निर्णय घेतलेला नाही. पण काँग्रेसची मते फोडून त्‍याचा फायदा भाजपला करून देण्‍यासाठी मी रिंगणात उतरत आहे, असा समज जर कुणी करून घेत असेल तर ही निवडणूक मी लढवूच इच्‍छित नाही, असे चर्चिल आलेमाव म्‍हणाले. 2014 ची लोकसभा निवडणूक मी जिंकण्‍यासाठीच लढविली होती.

मात्र त्‍यावेळी मतदानयंत्रांत फेरफार केल्‍यामुळे मला फक्‍त 11 हजार मते प्राप्‍त झाली. त्‍याचा फायदा कदाचित भाजपला झालाही असेल, पण मते फोडून भाजपला जिंकून आणण्‍याचा माझा कोणताच इरादा नव्‍हता. त्‍यावेळी माझ्‍यावर विनाकारण आरोप झाले. मतयंत्रांत मतांची फेरफार केली जाते असे तेव्‍हा मी म्‍हणत होतो. तुम्‍ही पत्रकारांसह सर्वांनी मला त्‍यावेळी वेड्यात काढले होते. त्‍यावेळी मी जे काय बोलत होतो, तेच आज राष्‍ट्रीय नेते बोलू लागले आहेत. यावरून लोकांनी काय ते समजावे असेही चर्चिल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com