Campal Ground Construction : कांपाल फुटबॉल मैदानाचे काम रेंगाळले ; 2014 मध्ये राज्य सरकारने दिली होती परवानगी

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीतील गोवा राज्य नगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या (जीसुडा) जागेवर यापूर्वी कवायत मैदान होते.
football stadium Campal Ground Construction:
football stadium Campal Ground Construction: Dainiik Gomantak

Campal Ground Construction: पणजी, कांपाल येथे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत निर्माण होत असलेल्या फुटबॉल मैदानाचे ८० टक्के काम झाले असले तरी नोव्हेंबरपर्यंत मैदानाचे सर्व काम पूर्ण करण्याची मुदत ओलांडली जाण्याची शक्यता असल्याचे तेथील कामांची गती पाहता दिसून येते.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीतील गोवा राज्य नगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या (जीसुडा) जागेवर यापूर्वी कवायत मैदान होते.

परंतु पणजीचा स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत समावेश झाल्याने कवायत मैदानाच्या ठिकाणी फुटबॉल मैदानाचे काम सुरू करण्याचे निश्‍चित झाले.

२०२१ मध्ये या कामाला सुरवात झाली. या मैदानाच्या निर्मितीसाठी ३०.९ कोटींची तरतूद करण्यात आली.

त्यात ६०ः४० असा खर्च करण्याचे ठरले, त्यानुसार पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल)चा वाटा १८.०५ कोटींचा तर जीसुडा १२.०४ कोटी रुपये करण्याचे निश्‍चित झाले होते.

२०२१ मध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली तरी तो नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे काम बाकिया कन्स्ट्रक्शनकडे दिले होते. या कंपनीने मैदानाचे काम गतीने पूर्ण केले, त्याशिवाय प्रेक्षक गॅलरीचेही काम होणे बाकी आहे.

football stadium Campal Ground Construction:
Goa Dogs vaccination: गोव्यात एकूण 6,000 श्वानांचे लसीकरण; जागतिक रेबीज दिनी सुरू झाली होती मोहिम

व्यायामशाळा व शौचालय उभारण्याचे काम बाकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारने २०१४ मध्ये फुटबॉल मैदान उभारण्यास परवानगी दिली होती.

कंपनीकडून कामाची गती मंदावली

येथील अभियंत्यांच्या मते मैदानाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु सध्या कामांची पाहणी केली असता, त्यात जेवढी गती हवी आहे तेवढी ती दिसत नाही.

त्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये मैदान हस्तांतर करण्याची तारीख पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. मैदानाचे काम ज्या कंपनीकडे आहे,

त्या कंपनीकडे शहरातील स्मार्ट सिटीची महत्त्वाची कामे आहेत, त्यामुळे त्या कामासाठी लागणारे ट्रक व इतर साहित्य याच मैदानाच्या परिसरात ठेवलेले आहेत, जर मैदान पूर्ण झाले तर हे साहित्य तेथे ठेवता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com