Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Calangute Water Shortage: प्रकल्पामुळे पिळर्ण औद्योगिक वसाहतीसह या भागातील सुमारे ७५ हजार रहिवाशांना तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना फायदा होणार आहे.
Calangute Water Shortage
Calangute Water SupplyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कळंगुट: कळंगुट, कांदोळी, पिळर्ण, रेईश मागूश, नेरूल आणि साळगाव परिसरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून जलस्रोत खात्याने उभारलेल्या ३० एमएलडी क्षमतेच्या कच्च्या पाण्याच्या पंपिंग स्टेशनचे बुधवारी (ता. ७) लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी ४.३० वाजता कळंगुट येथील पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल.

या प्रकल्पामुळे पिळर्ण औद्योगिक वसाहतीसह या भागातील सुमारे ७५ हजार रहिवाशांना तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना फायदा होणार आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्रातून सध्या या भागाला २७ एमएलडी पाणीपुरवठा होतो, तर मागणी ३८.८ एमएलडी आहे. त्यामुळे असलेली तूट या प्रकल्पामुळे भरून काढण्यास मदत होणार आहे.

Calangute Water Shortage
Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

या प्रकल्पासाठी नाबार्डकडून १३.७९ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, मे. शेठ अँड सुरा इंजिनिअर्स प्रा. लि. यांनी सुमारे १६.२० कोटी रुपये खर्चून काम पूर्ण केले आहे. तिळारी कालव्याच्या कळंगुट वितरिकेतून कच्चे पाणी उचलून ते पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील वितरण टाकीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

योजनेमुळे होणार अनेक फायदे

योजनेमुळे हॉटेल्स, उद्योग आणि निवासी संकुलांकडून होणारा भूजल उपसा कमी होण्यास मदत होईल. तसेच जीआयडीसी पिळर्णची ३ एमएलडी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची घरगुती वापरासाठीची ३० एमएलडी कच्च्या पाण्याची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे.

Calangute Water Shortage
Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

पूर्ण क्षमतेने पंपिंग स्टेशनमधून दररोज ३० एमएलडी कच्चे पाणी पुरविले जाणार आहे. तिळारी पाटबंधारे प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गोवा यांचा संयुक्त प्रकल्प असून, त्याची एकूण वहन क्षमता ३२० एमएलडी आहे. त्यापैकी १०० एमएलडी पाणी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी राखीव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com