CM Pramod Swant: सभापती अन् मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचे कारण 'आयुर्वेद'

नागपूर येथील आयुर्वेद आंतरराष्‍ट्रीय परिषदेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले संबोधित
CM Pramod Swant
CM Pramod SwantDainik gomantak
Published on
Updated on

नागपूर येथे शाश्‍वत, प्रभावी अणि उपयुक्त आयुर्वेदाचा प्रचार अणि प्रसार करण्यासाठी तसेच, आयुर्वेदाचे संशोधन व शिक्षण देण्‍याच्‍या उद्देशाने 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे ( International Conference) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबोधित केले.

(cm Pramod Sawant invites everyone for the World Ayurveda Congress which is scheduled to take place in Goa )

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विशद करत आपण आयुर्वेदामुळेच सभापती आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो, तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच आयुर्वेदाला देशात आणि जगभरात अच्छे दिन आल्याचं ही सावंत यांनी म्हटले आहे. यावेळी सावंत यांनी आयुर्वेद डॉक्टरांचे विमा दावे मंजूर करण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना केली. तसेच गोव्यात होत असलेल्या आयुर्वेद काँग्रेससाठी सर्वांना आमंत्रित केले.

CM Pramod Swant
OffCourse, विश्वजीत राणेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य; विजय सरदेसाईंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

हा कार्यक्रम भारत सरकारच्‍या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे होत आहे. या चर्चासत्राचे उद्घाटनसोहळा आज शनिवार, 12 रोजी सकाळी 10.30 वाजता पार पडला.

या कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, भारतीय चिकित्‍सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी व श्री धूतपापेश्‍वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत पुराणिक यांची उपस्‍थ‍ित होते.

CM Pramod Swant
Goa Beach: किनारी भागात आढळला जेलीफिश

शनिवार दि 12 नोव्हेंबर रोजी आयुष मंत्रालयाचे वैद्य श्री कौस्तुभ उपाध्याय यांच्या उपस्थितीत आयुर्वेदीय औषधी निर्मात्यांचे सम्मेलन होणार आहे. रविवार, 13 नोव्‍हंबर रोजी सकाळी 11.30 केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्‍या हस्‍ते परिषदेचा समारोप होईल.

'या' विषयांवर होणार चर्चा

तीन दिवसीय या आयोजनात नेत्रचिकित्‍सा, रक्‍तमोक्षण, जानुसंधी परीक्षण, अग्निकर्म, मर्म चिकित्‍सा, आयुर्वेदिय दंतोत्‍पाटन विषयावर कार्यशाळा होणार असून राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘विदेशात आयुर्वेदाच्‍या संधी’, ‘आयुर्वेदातील आपात्‍कालीन चिकित्‍सा’, ‘बीएएमएसनंतर करीअरच्‍या संधी’, ‘वन्‍ध्‍यत्‍व’ या विषयावर चर्चासत्र होणार आहेत. याशिवाय, संशोधन आदी विषयांवर समांतर सत्रदेखील राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com