Calangute News : वागातोरच्या किनारी भागात हॉटेलमालकांकडून सांडपाणी समुद्रात! परिसरात दुर्गंधी

Calangute News : स्थानिकांकडून आरोग्य केंद्रात तक्रार; दरवर्षीच्या प्रकाराने नागरिकांत नाराजी
Calangute
Calangute Dainik Gomantak

Calangute News :

कळंगुट, बार्देशातील वागातोर येथील किनारी भागातील हॉटेलांचे सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याचे समोर आले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याची तक्रार या भागातील जागृत नागरिकांकडून स्थानिक आरोग्य केंद्राच्या कार्यालयात दाखल करण्यात आली आहे.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या भागातील तारांकीत हॉटेलमालकांकडून अशी कृत्ये करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असल्याने येत्या सोमवारी शिवोली आरोग्य केंद्राचे अधिकारी या भागाची पाहणी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बार्देशातील सिकेरीपासून कांदोळी आणि कळंगुटपासून बागा ते हणजुण - वागातोरपर्यंतच्या किनारी भागात दरवर्षी पर्यटन हंगामात परिसरातील अनेक हॉटेलवाल्यांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सांडपाणी किनाऱ्यावर सोडण्यात येते आणि हे पाणी पुढे समुद्रात जाऊन मिसळते, असे स्थानिक ग्रामस्थ जोविस मोनीझ यांनी सांगितले.

हॉटेलवाल्यांकडून होत असलेल्या अशा कृत्याला आळा घालण्यासाठी दरवर्षीच स्थानिक आरोग्य केंद्राच्या कार्यालयात तक्रारी करण्यात येतात, परंतु परिसरातील बहुतेक हॉटेलचालक कुणालाही न जुमानता दरवर्षीच हॉटेलचे सांडपाणी किनाऱ्यावर सोडतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

Calangute
Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

कायदेशीर कारवाईची मागणी

वागातोर व परिसरातील किनारी भागात हॉटेलवाल्यांकडून टाकण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे किनारी भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती अनेकांनी बोलून दाखविली.

संबंधित आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष देऊन दोषी हॉटेलवाल्यांवर कायदेशीर कारवाई करावी व दुर्गंधी तसेच रोगराईपासून स्थानिकांची मुक्तता करावी, अशी मागणी जोनीस मोनीझ व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com