Calangute Police tenant verification drive:
Calangute Police tenant verification drive: Dainik Gomantak

Calangute Police: कळंगुटमध्ये अचानक भाडेकरू पडताळणी मोहिम; अनेकांचे बेकायदेशीर वास्तव्य

पोलिसांकडून 200 नागरीकांची तपासणी

Calangute Police tenant verification drive: कळंगुट पोलिसांनी गुरूवारी अचानक भाडेकरू पडताळणी मोहिम राबवली. ओर्डा, कांदोळी परिसरात ही मोहिम राबवण्यात आली. यात सुमारे 200 नागरीकांची तपासणी करण्यात आली. पैकी अनेकजण बेकायदेशीररित्या राहत असल्याचे समोर आले आहे.

अनेकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये त्यांची पडताळणी केलेली नाही. योग्य पडताळणी न करताच अनेक जण वास्तव्य करत असल्याचे समोर आले. खोली मालकांना पोलिसांनी भाडेकरूंच्या पडताळणीचे महत्त्व पटवून दिले.

Calangute Police tenant verification drive:
Goa Monsoon 2023: राज्यात 15 सप्टेंबरपासून 4 दिवस मुसळधार बरसणार पाऊस; गोवा वेधशाळेचा अंदाज

ज्यांची पडताळणी झालेली नाही, त्यांना कळंगुट पोलीस ठाण्यात संपर्क करण्यास सांगण्यात आला आहे. कायद्यानुसार भाडेकरूचा तपशील स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे.

कळंगुट पोलिस कर्मचार्‍यांनी ओर्डा कांदोळी येथे घरोघरी भेट देऊन भाडेकरू पडताळणी मोहिम राबवली. पडताळणी प्रक्रियेचे पालन केले आहे की नाही हे तपासले. कळंगुट पोलिसांनी यापुर्वी खोबरोवाडो येथे अशी मोहिम राबवली होती.

कळंगुट पोलिस आपल्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही भागात कधीही अशी मोहिम राबवू शकतात. प्रभावी पोलिसिंग करण्यासाठी आणि कळंगुट पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात 100 टक्के भाडेकरू पडताळणीसाठी अशी मोहिम कुठेही, कधीही आखली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com