Goa Beggars Issue: बागा, कळंगुट परिसरातील 14 भिकारी व बेघरांवर कारवाई; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोवा दमण आणि दीव भिकारी प्रतिबंधक कायदा 1972 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Calangute Police Conduct Drive Against Beggars At Calangute And Baga Beach
Calangute Police Conduct Drive Against Beggars At Calangute And Baga BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Police Conduct Drive Against Beggars At Calangute And Baga Beach: गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. जगभरातील पर्यटक पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी गोव्यात येत असतात हे खरे असले तरी भिकारी आणि बेघरांनाही गोवा हे त्यांच्या जगण्यासाठी एक योग्य ठिकाण, राहण्याचे आश्रयस्थान वाटते.

राज्यात जगभरातील पर्यटक पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी येतात मात्र गोव्यात आणि मुख्यतः किनारपट्टीभागात भिकाऱ्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो.

Calangute Police Conduct Drive Against Beggars At Calangute And Baga Beach
Kamakshi Murder Case: कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरण; दोघा संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शनिवारी कळंगुट पोलिसांच्या पथकाने मोहीम सुरू केली. या मोहिमेत कळंगुट आणि बागा बीच परिसरातील 14 भिकारी आणि बेघर लोकांना पकडण्यात आले.

यात काही महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर गोवा दमण आणि दीव भिकारी प्रतिबंधक कायदा 1972 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंगुटमधील भिकारी आणि बेघरांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारचे अभियान सुरूच ठेवणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांमार्फत देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com