Goa Crime: कळंगुट येथे एकावर चाकू हल्ला; मानेवर केले सपासप वार

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Jail
JailDainik Gomantak

राज्यात गुन्हेगारी वाढते आहे का? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. कारण सातत्याने मारामारी, चोरी, लुटमारी याचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज कळंगुट येथे चाकू हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Calangute police arrests Urban Dsouza for allegedly assaulting with a knife )

Jail
Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट येथील अर्बन डिसूझा (59) याने एकावर चाकूने हल्ला केला आहे. हल्ल्यावेळी डिसूझा याने पीडित व्यक्तीच्या मानेवर सपासप वार केले आहेत. हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळाली नसली तरी याची तक्रार कळंगुट पोलिसांत दाखल झाली आहे.

Jail
Vijai Sardesai On Mhadei: ...अन्यथा बार्देश, सांगेचा पाणीप्रश्न पेटणार

डिसूझाने केलेल्या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या आहेत. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्यातील पीडित व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान आज सकाळी नेसाय येथील कालव्याच्या बाजूला एका 21 वर्षे युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा खुनाचा प्रकार असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणात पोलीस चौकशी सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com