Calangute Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई

संशयिताकडून 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
Calangute Police arrested Person In Drug Case
Calangute Police arrested Person In Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Calangute Drug Case: गोव्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पोरबोवाडा येथे कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकल्याचे वृत्त समोर आले असून यात एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

Calangute Police arrested Person In Drug Case
Mahadayi Water Dispute: कळसा भांडूरा प्रकल्प पूर्ण करणारच; बोम्मईंनी गोव्याच्या जखमेवर चोळले मीठ

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट येथील पोरबोवाडा येथे एका रिसॉर्टजवळ एक संशयित अंमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत यशस्वीरित्या छापा टाकला.

या छाप्यात संशयित बिजय मल्लिक (26, रा. ओडिशा) याला अटक करण्यात आली असून संशयिताकडून एकूण 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 5.5 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संशयित बिजय मल्लिक याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. ही कारवाई पीआय दत्तगुरू सावंत यांच्या देखरेखीखाली पीएसआय परेश सिनारी, पोलीस हवालदार विजय नाईक, अमीर गरड, भगवान पालयेकर, गणपत तिलोजी, संज्योत केरकर, आकाश नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com