Arrested
ArrestedDainik Gomantak

Calangute: बलात्काराचा आरोप करुन मागितली खंडणी; कळंगुट पोलिसांकडून दोन महिलांसह पुरुषाला अटक

सदर महिला लोकांना खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवत असे
Published on

Extortion Racket Busted By Calangute Police: लोकांना सापळ्यात ओढून खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवणाऱ्या संशयितांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. ही टोळी खंडणीच्या उद्देशाने हे कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Arrested
GHRDCच्या 370 जागांच्या थेट मुलाखतीसाठी हजारो उमेदवार; महामंडळाच्या नाकीनऊ, घेतला मोठा निर्णय

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील एका व्यक्तीने कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुजरातमधील दोन महिलांनी तक्रारदारासोबत मैत्री प्रस्थापित केली.

खंडणीच्या उद्देशाने दोन्ही महिलांनी फिर्यादीवर बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी देत, त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले. त्यानुसार कळंगुट पोलिसांनी वरील फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून दोन महिलांना अटक केली. तर त्यांच्या पुरुष साथीदारालाही अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com