Calangute: अवैध कृत्यांविरोधात कळंगुट नागरिकांनी घेतला मोठा निर्णय; डान्सबारला आता कायमचीच...

स्थानिकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले
Illegal Pubs and Dance Bars in Goa
Illegal Pubs and Dance Bars in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: कळंगुट परिसरात परप्रांतीय दलाल तसेच बाऊसर्संकडून देशी पर्यटकांना लुबाडण्याबरोबरच स्थानिकांना मारहाण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच अवैध कृत्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने कळंगुट पंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

(Citizens of Calangute have decided to ban dance bars)

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पंचायतीने सोमवारपासून बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले की, सोमवारपासून बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी आणण्यात येणार आहे. तसेच कळंगुट येथे गुरुवारी मध्यरात्री कर्नाटकी तरुणांकडून स्थानिक तरुणांना मारहाण झाली आहे. अशी प्रकरणे परत घडू नयेत यासाठी दक्षता घेण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

Illegal Pubs and Dance Bars in Goa
Purple Fest 2023: गोव्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेचे आयोजन

सरपंच सिक्वेरा यांनी सांगितले की, कळंगुटच्या किनारी भागात परप्रांतीय दलालांकडून देशी तसेच विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक तसेच आर्थिक लुबाडणूक होत आहे. याचा ठराव पंचायत मंडळाच्या बैठकीत घेऊन तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवला आहे. सध्याच्या परिस्थितीतीचा अंदाज घेत सोमवार पासून याभागातील बेकायदा डान्सबार तसेच ध्वनिप्रदूषणाने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Illegal Pubs and Dance Bars in Goa
Goa: केरी-तेरेखोल फेरीधक्का नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक!

दरम्यान, गुरुवारी रात्री कर्नाटकी तरुणांकडून स्थानिक युवकांना झालेल्या मारहाण प्रकरणात कळंगुट पोलिसांनी आरोपींना कायदेशीर अटक करून नंतर त्यांची लगेच जामीनावर सुटका केली आहे. त्यामुळे आरोपींचे मनोबल वाढण्याची भिती सरपंच सिक्वेरा यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com