Calangute : कळंगुटमध्ये डान्सबार नाहीच! हॉटेल मालकांचं धक्कादायक स्पष्टीकरण

कळंगुट परिसरात अद्याप छम छम सुरुच ?
Calangute
Calangutedainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट परिसरात अद्याप छम छम सुरुच आहे. तसेच परप्रांतीय दलाल, आणि बाऊसर्संकडून पर्यटकांना लुबाडले जाते असा आरोप स्थानिकांनी आहे. या आरोपाचे हॉटेल मालकांनी आज खंडन केले. व कळंगुटमध्ये डान्सबार बंद आहेत. तरीही काही लोक खंडणीच्या प्रयत्नात आहेत. यातूनच हॉटेल मालकांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. असा आरोप आज हॉटेल मालकांनी केला आहे.

(Calangute hotel owners have informed that dance bars are closed )

Calangute
Goa Mining : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खनिज व्यवसाय महत्त्वाचा; भाजपचा दावा

मिळालेल्या माहितीप्रमाणे आज कळंगुट परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंटचे मालक एकत्र आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमच्या क्लबमध्ये डान्सबार, पोल डान्स किंवा बारबाला असा कुठलाच गैरप्रकार चालत नाही. या बातम्या केवळ माध्यमांमध्येच झळकताहेत, वास्तविक क्लबमध्ये असे गैरप्रकार सुरू असल्यास पुराव्यासह दाखवून द्यावेत. ज्याप्रकारे इतर नामांकित क्लब व आस्थापने ही बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या परवान्यावर चालतात व त्याच परवानगीवर आम्ही सुद्धा व्यवसाय करतोय, असे स्पष्टीकरण ‘चावला’ व ‘डेव्हिल’ या क्लबचे सहमालक विपीन सिंग यांनी दिले.

Calangute
Goa Mining : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खनिज व्यवसाय महत्त्वाचा; भाजपचा दावा

यावेळी ‘तांव’ व ‘ट्रॉपिकल’ या क्लबचे नरेश गिडवानी, ‘बे-वॉच’चे दिपक देसाई, ‘थ्री किंग्स’ व ‘39’चे हरिष निल्लीकर आदी उपस्थित होते. यावेळी विपीन सिंग म्हणाले की, कळंगुटमधील काही गुंड प्रवृत्तीचे लोक पंचायतीच्या नावावर आमच्या क्लबमध्ये घुसखोरी करुन खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करताहेत. तसेच क्लबच्या कर्मचार्‍यांना मारहाण करतात.

मागील काही दिवसांपासून हे प्रकार सुरूच असून याविषयी अनेकवेळा पोलिस तक्रार केली, मात्र अपेक्षित कारवाई झालेली नाही असा दावा त्यांनी केला. याची कल्पना पोलीस महासंचालक तसेच महानिरीक्षकांना दिल्याचे ते म्हणाले. येत्या काळात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असेही त्यांनी सांगितले.

रविवारी मध्यरात्री ‘डेविल्स नाईट’ क्लब बंद असताना काही गुंडप्रवृत्तीचे लोक क्लबमध्ये घुसले. ते आपल्यासोबत जेवणाची पाकिटे घेऊन आले होते व क्लब कधी सुरु करणार असे म्हणत क्लबमधील कर्मचार्‍यांना त्यांनी मारहाण केल्याचा आरोप विपीन सिंग यांनी केला. मागील 17 ते 18 वर्षांपासून आम्ही कळंगुटमध्ये कार्यरत असल्याचे सांगत विपीन सिंग म्हणाले की, क्लबबाहेर आमचे काही कर्मचारी गळ्यात आयडी काडर्स घालून क्लबचे प्रोमोशन करतात. ते टाऊट्स नव्हे. मात्र, इतर बेकायदा टाऊट्सविषयी आम्हाला कल्पना नाही.

क्लब मालक नरेश गिडवानी म्हणाले की, बेकायदा टाऊट्सविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई करावी, त्यासाठी आमची कळंगुट पंचायत तसेच ग्रामस्थांना मदत करण्याची तयारी असल्याचे या क्लब मालकांनी सांगितले. कळंगुट पंचायतींनी आम्हाला नोटीस बजावली खरी मात्र ती बेकायदा बांधकामाविषयी आहे. आमचा व्यवसाय बेकायदा आहे असे कुठेच यात नमूद केलेले नाही. तशा आशयाची नोटीस आल्यास आम्ही नक्की उत्तर देऊ.

डेव्हिल क्लबचे सहमालक विपीन सिंग म्हणाले की, जिथे बारबाला कथितरित्या नाचतात व पैसे उडविले जातात, अशी डान्सबार आमच्या क्लबमध्ये पोल डान्स किंवा इतर गैरप्रकार चालत नसतो. आस्थापनात वेट्रेस व डान्सर मुली आहेत. परंतु डान्सबार ही संकल्पनाच आमच्याकडे नाही. आमच्या क्लबमध्ये ‘स्टॅग’ एण्ट्री आहे. आम्हाला आमदार किंवा पंचायत त्रास देत नसून, स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक आमची सतावणूक करताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com