Calangute Murder Case: अपघात की घातपात? कळंगुट येथे हॉटेलमध्ये आढळला मध्यप्रदेशच्या महिलेचा मृतदेह

Goa Murder Case: मध्य प्रदेशातील खांडवा येथील ३५ वर्षीय महिला भावना चौहान या महिलेचा मृतदेह कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे.

कळंगुट: मध्य प्रदेशातील खांडवा येथील ३५ वर्षीय महिला भावना चौहान या महिलेचा मृतदेह कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त करत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुखवटा घातलेले व्यक्ती भावना चौहान यांच्या खोलीत शिरताना दिसून आले आहेत. त्यामुळे हा संशयास्पद प्रकार असून, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

गोवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपासाच्या अनुषंगाने मध्य प्रदेशातील दोन संशयितांना अटक केली आहे. या घटनेमागील संभाव्य कारणे आणि हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
41 year old man found dead inside car in Calangute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com