Goa: ...यामुळे काब्राल यांनी गोमंतकीयांची माफी मागावी- सबनीस

विधिमंडळ कामकाज मंत्री काब्राल यांनी काँग्रेस आमदारांना विधानसभेच्या निकषांवर प्रवचन देणे थांबवावे. असेही कुडचडे गट काँग्रेसचे अध्यक्ष पराग सबनीस म्हणाले.
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: तीन वेळा आमदार आणि दोनवेळा मंत्री असलेले नीलेश काब्राल हे स्वतःच्या जबाबदाऱ्यांबद्दल अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या प्रसारित झालेल्या विविध माध्यमांच्या व्हिडीओवरून दिसून येते. विधिमंडळ कामकाज मंत्री काब्राल यांनी काँग्रेस आमदारांना विधानसभेच्या निकषांवर प्रवचन देणे थांबवावे.

भाजप सरकारने लोकशाहीच्या केलेल्या हत्येबद्दल गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी कुडचडे गट काँग्रेसचे अध्यक्ष पराग सबनीस यांनी केली.

नीलेश काब्राल यांनी मागील विधानसभा अधिवेशनांच्या कामकाजांचे खंड वाचावेत. त्यामुळे विशेषतः काँग्रेस राजवटीत सभागृह कामकाजात विरोधकांना कसे महत्त्व आणि समान संधी दिली गेली, हे त्यांना समजेल.

Nilesh Cabral
Chartered Plane to Goa : किर्गिस्तानचे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बैठक बोलावल्यानंतर सात विरोधी आमदार एकत्र आल्याने भाजप सरकार हादरले आहे, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या नेत्यांबद्दल कोणतीही खोडसाळ टिप्पणी आम्ही खपवून घेणार नाही, असेही सबनीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com