Goa Cabinet: ‘अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार’

Sadanand Tanavade: मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे
Sadanand Tanavade: मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाबाबत अलीकडे माझ्याशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोललेले नाहीत. आता विधानसभा अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार असल्याने तत्पूर्वी हा फेरबदल होईल असे वाटत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेरबदल होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली काय असे विचारले असता तानावडे म्हणाले, मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे.

तरीही हे सरकार भाजपचे असल्याने प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याशी ते असा फेरबदल करण्यापूर्वी चर्चा करतील. अद्याप त्यांनी या विषयावर चर्चा न केल्याने आणि अधिवेशन जवळ पोहोचल्याने आता मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याने मी यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. मात्र, आम्ही या विषयावर चर्चा केली नाही, हेही तितकेच खरे आहे.

Sadanand Tanavade: मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे
Cabinet Meeting - भाषा संशोधन केंद्राला मंत्रिमंडळाची मंजूरी | Gomantak TV

आसगाव प्रकरणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आसगाव येथे झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. तसे तेथे होता कामा नये होते. न्यायालयाने घर पाडण्याचा आदेश आणि पोलिसांनी संरक्षण पुरविले तर ते कायद्याला धरून आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश नसताना बेकायदेशीर गोष्टींसाठी पोलिसांनी संरक्षण देणे हे कदापिही खपवून घेतले जाऊ नये.

या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतली असेल तर त्याच्यावर सरकारने कारवाई करावी. हे प्रकरण उदभवले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली होती. त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि कालच दिल्लीतून परत आलो. त्यानंतर या विषयावर मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली नाही. राज्यामध्ये बाऊन्सर्स संस्कृती रुजू नये, असे मला वाटते आणि सरकार त्या दिशेने पावले टाकील, अशी खात्री आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com