Aleixo Sequeira: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ बंडखोर आमदारांपैकी एकाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाने पूर्ण केले आहे. काब्राल यांचा राजीनामा घेतल्यानंतर रविवारी आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
सिक्वेरा यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. दरम्यान, याबाबत आता माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश काब्राल यांच्याकडे असलेले सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत:कडे ठेवणार आहेत.
तर, नव्याने शपथ घेतलेले मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना पर्यावरण, बंदर कप्तान, कायदा आणि संसदीय कामकाज ही खाती मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरतीत सुमारे १४० कोटींचा घोटाळा झाला असून याची चौकशी सीबीआय किंवा ‘ईडी’द्वारे करण्यात यावी, अशी मागणी ‘आरजी’चे आदित्य देसाई यांनी केली होती.
दरम्यान, काब्राल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार हे गुलदस्त्यात होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.