'गोव्यात हफ्ता दिल्याशिवाय धंदा चालत नाही', रोमिओ लेन दुर्घटनेवरून केजरीवालांचा भाजप सरकारवर हल्ला

Kejriwal Goa allegation: हडफडे येथील अग्नितांडव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वादाचा मुद्दा बनला
Arvind Kejriwal Goa
Arvind Kejriwal GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Kejriwal attacks BJP in Goa: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवात २५ लोकांच्या मृत्यूनंतर गोवा प्रशासनाने पर्यटन आस्थापनांविरोधात आपली कारवाई तीव्र केली आहे. शनिवारी (दि. १३) वागातोरमधील एका प्रसिद्ध क्लबला सील करण्यात आले, तर उत्तर गोव्यातील आणखी एका ठिकाणचे अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) रद्द करण्यात आले आहे.

राजकीय वातावरण तापले; केजरीवाल यांचे गंभीर आरोप

हडफडे येथील अग्नितांडव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वादाचा मुद्दा बनला. चिंबल गावात आपल्या पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारासाठी प्रचार करताना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या घटनेसाठी भाजपप्रणित राज्य सरकारला जबाबदार धरले.

"ही आग का लागली? मी वृत्तपत्रांमध्ये वाचले की या नाईट क्लबकडे ऑक्युपेंसी सर्टिफिकेट, बिल्डिंग लायसन्स, एक्साईज लायसन्स, बांधकाम लायसन्स किंवा ट्रेड लायसन्स काहीच नव्हते. संपूर्ण क्लब बेकायदेशीर असतानाही तो सुरू होता," असे केजरीवाल म्हणाले.

माजी दिल्ली मुख्यमंत्र्यांनी पुढे आरोप केला की, "हे कसे चालू शकले? मुख्यमंत्री किंवा इतरांना हे दिसले नाही का? मला सांगण्यात आले की या प्रकरणात 'हफ्ता' (लाच) दिला जात होता." भ्रष्टाचार व्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेला असल्याचा दावा त्यांनी केला, आणि अधिकाऱ्यांपासून ते मंत्रीपर्यंत सर्वजण लाच घेत असल्यामुळे कोस्टल स्टेटमध्ये पैसे दिल्याशिवाय व्यवसाय करणे अशक्य आहे, असे म्हटले.

Arvind Kejriwal Goa
Goa Politics: 'आरजी'शी युतीस विरियातोंचा हाेता विरोध, तीन आमदारांचा आग्रह; परब यांच्‍या पवित्र्याबद्दल होता संशय

'कॅफे CO2' आणि 'डियाज पूल क्लब'वर कारवाई

राज्यात रात्रभर चालणाऱ्या क्लबच्या नियम-पालनाचे ऑडिट सुरू झाल्यानंतर ही मोठी कारवाई झाली. वागातोर बीचवर अरबी समुद्राला लागून असलेल्या ओझ्रान्त क्लिफच्या शिखरावर असलेला प्रसिद्ध 'कॅफे CO2' क्लब सील करण्यात आला आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तपास पथकाला या २५० आसनक्षमतेच्या क्लबमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे पुरावे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी याच आठवड्यात नियमांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल वागातोरमधील 'गोया क्लब' देखील सील करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com