Valpoi News : पोलिस निवासी गाळे निकामी; वाळपईमधील स्थिती

कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती
Valpoi Police Residential Complex
Valpoi Police Residential ComplexDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई पोलिसांसाठी असलेली इमारत जुनी झाली असून त्या इमारतीची अत्यंत दयनीय व्यवस्था झालेली आहे. कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे येथे राहण्याऱ्या कर्मचाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी गाळे सोडले.

आता या इमारतीत कोणीच राहत नाही. इमारतीच्या बाजूला झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे परिसर भयानक अवस्थेत आहे. वाळपई गृह खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोलिस निवासी गाळे (काॅटर्स) नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

वाळपई उच्च माध्यमिक विद्यालय इमारतीच्या बाजूला असलेली फलोत्पादन वर्गाची इमारत मोडकळीस आलेली आहे. ही इमारत पाडून दुसरी इमारत बांधण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच या इमारतीच्या जागी दुसरी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

Valpoi Police Residential Complex
Margao rumdamal dovorlim : पार्क केलेल्‍या गाड्या फोडल्‍याने वादग्रस्त रुमडामळ पुन्‍हा चर्चेत

मात्र, सध्या या इमारतीतच 11वी व 12वी इयत्तेचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे मुलांना जीव मुठीत धरून वर्गात बसावे लागत आहे.

दुरुस्ती टप्प्याटप्प्याने

सत्तरीत एकूण 101 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळेच्या इमारती जुन्या आहेत तर काही नवीन. मात्र, टप्प्याटप्प्याने शाळेच्या इमारतींची दुरुस्ती हाती घेतली जात आहे.

आता एकूण 2-3 शाळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे एकूण 108 अंगणवाड्या सत्तरीत आहेत. त्या इमारती सुस्थितीत आहेत.

Valpoi Police Residential Complex
गोवा राज्यसभा निवडणूक! भाजपकडून सदानंद तानावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा, आज भरणार उमेदवारी अर्ज

आमदारांकडून प्रयत्न

वाळपई तालुका ग्रंथालयाची इमारतही जुनी झालेली आहे. मात्र, या इमारतीची दुरुस्ती लवकरच हाती घेण्यात येणार आहे. वाळपई कृषी कार्यालयाच्या पूर्वीच्या इमारतीचीही अत्यंत वाईट परिस्थिती होती.

त्यामुळे आमदार विश्वजीत राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नांनी नवीन वास्तू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाचीही नवीन इमारत काही दिवसांत बांधली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com