पणजी: राज्यातील पुरातन, संरक्षित वारसास्थळांचे संरक्षण व्हावे यासाठी भारतीय पुरातत्व विभाग (एएसआय) आणि राज्य पुरातन विभाग यांच्या ताब्यात असलेल्या वास्तूभोवती 100 मीटरची जागा ‘बफर झोन’ म्हणून सीमांकित करणार असल्याचा प्रस्ताव राज्य पुरातन पुरातत्व विभागाचा असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे मंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत दिली आहे.
(buffer zone of 100 meters around ancient, protected structures in goa)
प्रश्नोत्तराच्या तासावेळी बोलताना राणे म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी पुरातन वारसा वास्तू आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रादेशिक विकास आराखडा 2020 मध्ये अनेक नियम बनविण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यापूर्वीही खात्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत. त्या सुधारून लवकरच नगरनियोजन खात्याच्या अधिनियमांमध्ये बदल करून पुरातन वास्तूंच्या भोवती 100 मीटरची जागा संरक्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
ही जागा बफर झोन म्हणून ओळखली जाईल आणि तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम, अतिक्रमण करता येणार नाही असेही राणे म्हणाले.
दरम्यान, यासंबंधीची अधिसूचना लवकरच राज्य पुरातत्व विभागाकडून काढण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
लवकरच नगरनियोजन खात्याच्या अधिनियमांमध्ये बदल करून पुरातन वास्तूंच्या भोवती 100 मीटरची जागा संरक्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ही जागा बफर झोन म्हणून ओळखली जाईल आणि तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम, अतिक्रमण करता येणार नाही.
- विश्वजीत राणे, पुरातत्त्व विभागाचे मंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.