BTech च्या विद्यार्थ्याने चुलतीचा खून करुन पेट्रोलने मृतदेह जाळला, दागिने लुटून गोव्यात केली पार्टी

Bengaluru Karnataka Murder Case: खून केल्यानंतर संशयिताने महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आला.
Bengaluru Karnataka Murder Case
Bengaluru Karnataka Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Karnataka Murder Case

चुलतीची हत्या केल्याप्रकरणी 20 वर्षीय बीटेक विद्यार्थ्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली. 50 हजार रुपयांसाठी त्याने महिलेची हत्या केल्याची माहिती तापसातून समोर आली आहे.

खून केल्यानंतर संशयिताने महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आला. 12 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली त्यानंतर बुधवारी (28 फेब्रुवारी) त्याला अटक करण्यात आली.

जसवंत रेड्डी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जसवंत कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकच्या तिसऱ्या वर्षात शिक्षत आहे.

चुलतीचा खून केल्यानंतर संशयित आरोपी विद्यार्थी गोव्याला गेला होता. तेथे त्याने मित्रांसह पार्टी केली व परतल्यानंतर कॉलेजला देखील जाऊ लागला.

सुकन्या (37) असे मृत महिलेचे नाव असून, त्या इलेक्ट्रॉनिक्स सिटीजवळ दोड्डाथोगुरु येथे राहत होत्या. सुकन्या एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हाऊसकीपिंगचे काम करत होत्या.

सुकन्याचे पती डी नरसिम्हा रेड्डी यांनी 13 फेब्रुवारी रोजी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

Bengaluru Karnataka Murder Case
Mapusa Theft Case: बोडगेश्वर मंदिरात चोरी; दोघांना अटक

बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवंत याचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अपघात झाला होता. गुन्हा नोंद न केल्याच्या बदल्यात वाहन मालकाला त्याने 50 हजार देण्याचे आश्वासन दिले होते. जसवंत हा त्याच्या चुलती सुकन्या हिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करत होता.

सुकन्या यांना भेटण्यासाठी आणि दागिने लुटण्यासाठी तो 12 फेब्रुवारी रोजी भाड्याच्या कारमधून बेंगळुरूला आला.

सुकन्या कामावर घरी जात असताना, जसवंतने त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसविले. जसवंतने एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि कर्ज फेडण्यासाठी सुकन्याकडे पैसे मागितले.

पैशांसाठी नकार दिल्यानंतर जसवंतने तिचा गळा आवळून खून केला. त्याने सुकन्याच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चेन काढून तिचा मृतदेह एस बिंगीपुरा गावात एका निर्जनस्थळी फेकून दिला.

Bengaluru Karnataka Murder Case
Bicholim News : सरकारला जनतेच्या ‘अन्ना’ची काळजी: रवी नाईक

खून केल्यानंतर जसवंत होसूर येथे गेला, 5 लिटर पेट्रोल आणून त्याने सुकन्याचा मृतदेह जाळला. सुकन्याचे शरीर पूर्णपणे जळेपर्यंत तो तिथेच उभा राहिला. तसेच, सुकन्याचा फोन त्याने केआर पुरम येथील जंगलात फेकून दिला.

जसवंतने हैदराबादला जाऊन सोन्याची चैन 95 हजार रुपयांना विकली. या पैशातून त्यांनी 50 हजार रुपयांचे कर्ज फेडले. उरलेले पैसे घेऊन तो गोव्याला गेला आणि मित्रांसोबत पार्टी केली.

बेंगळुरू पोलिसांना सुकन्याचा CDR मिळवला, त्यातून जसवंतने तिला अनेकदा फोन केल्याचे उघड झाले. मंगळवारी (27 फेब्रुवारी) पोलिसांनी जसवंतला चौकशीसाठी बेंगळुरूला बोलावले.

काही महिन्यांपूर्वी सुकन्याशी बोललो होतो, असा दावा जसवंतने केला. कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही सांगाडे आणि जळालेले मांस जप्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com