Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News : सरकारला जनतेच्या ‘अन्ना’ची काळजी: रवी नाईक

Bicholim News : डिचोलीत नवीन जागेतील नागरी पुरवठाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन
Published on

Bicholim News:

डिचोली, सरकारला जनतेची काळजी आहे. देशातील एकही म्हणजेच गरिबातील गरीब नागरिक अन्नासाठी उपाशी पडणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी केले.

नागरी पुरवठा खात्याच्या डिचोलीतील नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर रवी नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

स्वस्त धान्य दुकानांतून वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी, यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत, असेही मंत्री रवी नाईक म्हणाले. येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात नागरी पुरवठा कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. बुधवारी (ता.२८) या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह नागरी पुरवठा खात्याचे संचालक जयंत तारी, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ आणि मुख्याधिकारी सचिन देसाई उपस्थित होते.

नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक सूरज शेट्ये यांनी स्वागत केले. तर अधिकारी राधा सावंत यांनी आभार मानले. राजन कडकडे यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्यास नगरसेवक ॲड. अपर्णा फोगेरी, ॲड. रंजना वायंगणकर, सुदन गोवेकर तसेच विविध भागातील सरपंच, पंचसदस्य आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

‘फोर्टिफाईड’बाबत गैरसमज

१ सरकार हे जनतेच्या हितासाठी वावरत आहे. दुसऱ्या बाजूने विरोधक फोर्टिफाईड तांदळाबाबतीत अपप्रचार करीत आहे. हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरवीत आहे, असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

२ नागरी पुरवठा कार्यालयाची पूर्वीची जागा अपुरी पडत असे. त्यामुळे नवीन जागा आवश्यक होती. ही मागणी पूर्ण झाल्याबद्धल डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी समाधान व्यक्त करून सरकारला धन्यवाद दिले.

Bicholim
Goa Student: परिवर्तन घडविण्याची क्षमता तरुणाईत

जनतेशी साधला संवाद

या कार्यक्रमापूर्वी नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी आमदार डॉ. शेट्ये आणि शेट यांच्या उपस्थितीत चहापान करता-करता जनतेशी संवाद साधला.

यावेळी डिचोलीतील काही स्वस्त धान्य दुकान चालक सोसायटीच्या प्रतिनिधींनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे आश्वासन मंत्री रवी नाईक यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com