Goa Covid-19 Updates
Goa Covid-19 UpdatesDainik Gomantak

Goa Covid Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

गोव्यात दैनंदिन कोविड केस पॉझिटिव्हीटीचा दर 2% च्या खाली
Published on

पणजी : राज्यातील (Goa) कोरोना नियंत्रणात (Covid Updates) असून गेल्या 24 तासांत कोरोनाचा बळी गेलेला नाही. तरीही नवे 49 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 174 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 75 हजार 375 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 19.88 टक्के आहे. दैनंदिन कोविड केस पॉझिटिव्हीटी दर 2% च्या खाली राहिला आहे.

एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, या कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत आहे की नाही याबद्दल निर्णायक टिप्पणी करण्यासाठी त्यांना आठवड्याभरातील परिस्थितीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. सध्या दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि एकाला डिस्चार्ज देण्यात आला.

Goa Covid-19 Updates
Omicron चा भडका एकाच दिवसात देशात 18 रुग्ण, केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइंस

रविवारी तब्बल 2,759 चाचण्या घेण्यात आल्या

आरोग्य केंद्रे आणि सरकारी रुग्णालयाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यात घेण्यात येणाऱ्या कोविड चाचण्यांची दैनंदिन संख्या 3,000 च्या आसपास होती. काल रविवारी दक्षिण गोवाच्या मडगाव केंद्रामध्ये 67 आणि नवीलीममध्ये 43 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी उत्तर गोव्यात, पणजी शहरातील आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार सर्वाधिक म्हणजे 40 सक्रिय प्रकरणांची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com