
बार्देस तालुक्यातील जमीन हडपल्याप्रकरणी ईडीने रोहन हरमलकरला अटक. ईडीने हरमलकरकडून १,००० कोटी रुपयांच्या रिअल इस्टेटची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांना १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
रंगनाथ शेट्ये (५५), विनोद शेटकर (४७) आणि कौशल शेट्ये (३२) हे सर्वजण मोइरा येथील रहिवासी आहेत. त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विवेक शिरोडकर आणि त्यांच्या गर्भवती पत्नीवर बस्तोरा येथे क्रूर हल्ला केल्याबद्दल या तिघांनाही अटक करण्यात आली होती.
कमिशनवर मुख्य लक्ष केंद्रित असल्याने, अक्षम सरकारने शिक्षणातील प्राधान्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या महिन्यात, मी प्रलंबित शाळा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु सरकार जलदगतीने कारवाई करण्यात अपयशी ठरले आणि आज विद्यार्थी आणि शिक्षकांचे नुकसान होत आहे. भाजप सरकार लोकशाहीच्या प्रत्येक विटाला नुकसान पोहोचवण्यात यशस्वी झाले आहे आणि आता शिक्षण व्यवस्थेच्या विटा सैल करत आहे : एलओपी युरी आलेमाओ
कामातील विलंबासाठी जबाबदार असलेल्या अभियंत्यांना मी भेटेन. फक्त ४ ते ५ शालेय प्रकल्प पूर्ण व्हायचे आहेत, ते लवकरच पूर्ण होतील", असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
१४ जून रोजी ६ तालुक्यांमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित खाजगी वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित केले जाईल. १८ जून रोजी जिल्हाधिकारी सर्व प्रकरणे निकाली काढतील. १०,५०० अर्जांपैकी ८७१ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत आणि ९४९ प्रकरणे वनक्षेत्राबाहेरील दाव्यांमुळे नाकारण्यात आली आहेत. या शिबिराचे उद्दिष्ट उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याचे आहे, १९ डिसेंबरपर्यंत सर्व १०,००० प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट आहे.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या सरपंचपदाची माळ लक्ष्मण गुरव यांच्या गळ्यात. बुधवारी झालेल्या बैठकीत झाली बिनविरोध निवड. अकरापैकी चार पंचसदस्यांची बैठकीकडे पाठ.
गोव्यात लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली वकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल एका महिला तक्रारदाराने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर कोल्वा पोलिसांनी एका वकिलासह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.
गुंडेलवाडा वेळुस वाळपई येथील सर्वांची आधार स्तंभ असलेली सरकारी प्राथमिक शाळेच्या छप्पराची दुरुस्ती महिनाभरापासून रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना भर पावसात शिकण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होऊनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही, यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
गोव्यातील कुडचडे येथे एका फार्म हाऊसवरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरळपाळ-दाबाळ येथील एका खासगी फार्ममध्ये कपडे बदलत असताना एका अल्पवयीन मुलीचा व्हेंटिलेटरच्या छिद्रातून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वास्को येथील पीडित मुलीच्या आईने कुडचडे पोलीस ठाण्यात सचिन कुमार (रा. उत्तर प्रदेश) नावाच्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
तारीवाडा- शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीला गळती. स्थिती गंभीर. गेल्या दोन वर्षांपासून पालकाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष. शाळेतील व अंगणवाडीतील मुलांवर छप्पर कोसळण्याचा धोका.
ताळगांवच्या सरकारी प्राथमिक शाळेला ताळगावच्या चर्च बाजूच्या कासा पोवो दे तळगांव या हॉलमध्ये शिफ्ट केलं आहे पीडब्ल्यूडीचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने मुलांना पुढच्या सोमवार पर्यंत या हॉलमध्ये शिकवलं जाणार आणि हे आम्ही मुलांच्या पालकांना ही सांगण्यात आलं आहे अशी माहिती शिक्षिका वर्षाली वेरेकर यांनी सांगितलं
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.