Sawantwadi: कुडाळहून पणजीला जाणाऱ्या बसचा झाला ब्रेक फेल, चालकाच्या सतर्कतेमुळं मोठी दुर्घटना टळली; 25 प्रवासी जखमी

Sawantwadi Bus Accident: कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसचा शुक्रवारी (२८ मार्च) इन्सुली घाटात भीषण अपघात झाला.
Sawantwadi Bus Accident
Sawantwadi Bus AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसचा शुक्रवारी (२८ मार्च) इन्सुली घाटात भीषण अपघात झाला. दुपारी अंदाजे ३.३० वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला. चालकानं प्रसंगावधान राखत बसला डोंगराच्या दिशेनं उंच भागात वळवलं आणि रोखली त्यामुळं मोठा अनर्थ टळला.

२५ प्रवासी जखमी

अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये काही महिला व लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी इन्सुली येथील स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवली.

Sawantwadi Bus Accident
Women Safety In Goa: गोवा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित! मुख्यमंत्री ठाम, भाडेकरू पडताळणीमुळे गुन्हेगारांवर वचक बसल्याचा दावा

दुसरीकडे, अक्कलकोट आणि शिर्डी देवदर्शन करून गोव्यात परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (२८ मार्च) आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघंजण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटे चारच्या सुमारास आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकाला धडकून पलटी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com