Goa Flowers: ..मळे बहरले! 'जाई'चा घमघमाट; बोरी हमरस्ता परिसरात खरेदीसाठी होतेय गर्दी

Borim Jasmine Flowers : प्रमुख रहदारीच्या रस्त्याशेजारी अनेक जाई विक्रेते जाईंचा घमघमाट पसरवत आहेत. महिलावर्ग केसात माळण्यासाठी वा भाविक देवाला वाहण्यासाठी जायांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
Jasmine flowers in Borim Goa
Jasmine flowers in Borim Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: येथील सुगंधी जाईंची फुले बाजारात उपलब्ध झाली असून येथील प्रमुख रहदारीच्या रस्त्याशेजारी अनेक जाई विक्रेते जाईंचा घमघमाट पसरवत आहेत. महिलावर्ग केसात माळण्यासाठी वा भाविक देवाला वाहण्यासाठी जायांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

बोरी गाव विविध फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात मोगरा, बकुळफुले, चाफा, केवडा, आबोली आदी विविध सुगंधी फुले आढळतात, परंतु गावातील नागरिकांना उपजीविकेसाठी मार्च, एप्रिल, मे महिन्यात मोगरा तर जुलै महिन्यापासून गावातील लहान मोठ्या टेकड्यांवर जाई फुलांचे मळे फुलतात. तिशे, बोरी, मांगिरवाडा, तामशिरे आदी अनेक भागात जायांचे मळे बहरलेले दृष्टीस पडतात.

मे महिन्यात या जाईंच्या झोपांसाठी जागा स्वच्छ करून घ्यावी लागते. पावसात सुरवात झाल्यावर जाईंच्या झोपांकडे वाढलेले गवत व अन्य वनस्पती काढून टाकून जागा स्वच्छ केली जाते. जाईंच्या झोपांना मातीचा भराव घातला जातो आणि जुलै महिन्यात जाईच्या झोपांना कळ्या यायला लागतात.

Jasmine flowers in Borim Goa
Jasmine Flower: 'जायांचे मळे वाचवायचेच'! ग्रामसभेत ठराव मंजूर; व्यावसायिक, निवासी प्रकल्पांना विरोध

कळ्या तयार झाल्यावर त्या काढल्या जातात व घरी आणून व्हावळी म्हणजेच केळीच्या पातळ दोराने गुंफल्या जातात. महिला जाया काढण्याचे व गुंफण्याचे काम करतात. जायांचे पट म्हणजेच गजरे सध्या ठिकठिकाणी विक्रीस ठेवलेले दिसून येतात. बोरी पूल, हमरस्ता, लोटीलीचा जोडरस्ता, कुठ्ठाळी पुलाचा जोडरस्ता तसेच मडगाव, फोंडा, सावर्डे, कुडचडे, पणजी, म्हापसा आदी ठिकाणी ही फुले विकली जातात.

Jasmine flowers in Borim Goa
Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

जायांच्या विक्रीतून चांगली कमाई

जाईंचे मळे फुलवणाऱ्या मालकांना चांगली कमाई होते. जाई फुलांच्या उत्पादनाला मोठे कष्ट पडत नाहीत. झोपे वाढवण्यासाठी खतपाणी लागत नाही. पावसाच्या पाण्यावर जाईंची झाडे वाढून येतात. काम फक्त जाईंच्या कळ्या काढण्याचे व त्या गुंफून विक्रीला नेण्याचे असते. बोरी गावातील सुगंधी जाई फुले सर्वत्र प्रसिद्ध आहेत. बोरी गावातील ग्रामदैवत श्री नवदुर्गा मंदिरात होणाऱ्या जायांच्या पूजेला या जाया दिल्या जातात. बा.भ. बोरकर यांनी आपल्या काव्यात बोरीतील सुगंधी जायांचे वर्णन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com