‘अटल सेतू’चे बांधकाम वादात

काम निकृष्ट झाल्याचा सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांचा आरोप
Atal setu
Atal setu Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’चे काम दिवसेंदिवस वादात सापडताना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या आरोपानंतर आता सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी प्रत्यक्ष ‘अटल सेतू’वर जाऊन निकृष्ट कामाचे दर्शन घडवत संपूर्ण प्रकल्पाच्या दर्जावर शंका व्यक्त केली आहे.

अटल सेतूवरील खड्डे आता नित्याची बाब झाली आहे. त्यातच फोंड्याकडे जाणाऱ्या दुभाजकापासून पुढे उतरतीवर सातत्याने अपघात होत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करावी आणि तोपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा असे आवाहन केले आहे.

Atal setu
फोंड्यातील रस्त्यांना हॉटमिक्सिंगची प्रतीक्षा; रहिवाशी त्रस्त

‘अटल सेतू’चे बांधकाम सुरू असताना सरकारने नेमलेले अभियंते प्रत्यक्ष कामाच्या स्थळी उपस्थित न राहिल्याने केवळ कंत्राटदारावर विसंबून राहिल्यामुळे या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तज्ज्ञ अभियंते असूनसुद्धा अशा घटना कशा घडतात? ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 वर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने मांडवी नदीवर हा तिसरा केबल स्टेड पूल उभारला आहे. या पुलाचे बांधकाम लार्सन आणि टुब्रो कंपनीतर्फे उभारला असून सध्या या प्रकल्पाची देखभाल संबंधित कंत्राटदाराकडेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Human Trafficking
 JBR Stone Private Limited
Monsoon Safety Goa
Goa Crime Branch Investigation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com