Nature Of Goa: निसर्गसौंदर्याने नटलेली ‘बोरी’

बोरी गाव हा सदाच डोंगरदऱ्यांनी वेढलेला हरितगाव. फुलांचे मळे, घरांच्या अवतीभोवती मोगरीच्या फुलांचे मांडव दृष्टीस पडतात.
Nature Of Goa
Nature Of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आदिमाता श्री नवदुर्गा देवीच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेला बोरी हा निसर्गरम्य गाव. सुमारे साडेबाराशे फूट उंचीच्या सिद्धनाथ पर्वतावरील श्री सिद्धनाथ मंदिराशेजारीच बारमाही वाहणारे दाडातळे जे भद्रकाशी तलाव या नावानेही प्रचलीत आहे, या तलावाच्या पाण्यावर सिद्धनाथ पर्वताबरोबरच गावातील बागायती आणि शेती पोसली जाते.

Nature Of Goa
Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खूनप्रकरणातील आरोपी बिद्रे दाम्पत्यांचे 4 बॅंकांचे ‘डिफॉल्टर’

बोरी गाव हा सदाच डोंगरदऱ्यांनी वेढलेला हरितगाव. फुलांचे मळे, घरांच्या अवतीभोवती मोगरीच्या फुलांचे मांडव दृष्टीस पडतात.

पाणवठ्याशेजारी केवड्याची झोपे तर बागायतीत चाफा आणि बकुळ अशी विविध तऱ्हेच्या फुलांनी तसेच फळांनी बोरी गाव समृद्ध बनला आहे.

बोरी गावात मंदिरेच मंदिरे. गावचे आद्य ग्रामदैवत श्री नवदुर्गा देवी. या मंदिरात वर्षभर धार्मिक विधी आणि उत्सव सुरू असतात.

Nature Of Goa
Vegetables of Goa: गोव्याची 22 टन भाजी बेळगावला

बोरीच्या श्री नवदुर्गा देवीला जत्रोत्सवाचा गोव्यात पहिला मान असून वर्षातून दोन जत्रोत्सव, दसरा, रामनवमी, दीपोत्सव, नौकाविहार, रथोत्सव, पालखी, लालखी, भजनी सप्ताह, नवमी उत्सव, जायांची पूजा, नेवऱ्यांची पूजा आदी विविध उत्सवांबरोबरच नित्य भजन, आरत्या, कीर्तने, प्रवचने आदींची रेलचेल सुरूच असते.

अलीकडच्या काळात बोरी गावात जवळपासच्या भागातून बरेच लोक स्थायिक झालेले आहेत. त्यांनी तसेच गावातील लोकांनी गावात लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरू केलेले आहेत. यात सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगाची संधी उपलब्ध झाली आहे. बोरी गाव आता प्रगतीच्या दिशेने पावले टाकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com