Vegetables of Goa: गोव्याची 22 टन भाजी बेळगावला

‘स्वयंपूर्ण गोवा’चा परिणाम: फलोत्पादन महामंडळाचे 2021-22 मधील यश
Vegetables of Goa
Vegetables of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

विलास ओहाळ

Vegetables of Goa: केंद्रातील भाजप सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिल्यानंतर राज्यात प्रमोद सावंत सरकारने ‘स्वयंपूर्ण गोवा’चा नारा दिला.

परराज्यांवर अवलंबून असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंचे उत्पादन करण्यावर राज्यातील जनतेने भर द्यावा, यासाठी राज्य सरकारने स्वयंपूर्णतेचा संकल्प सोडला.

Vegetables of Goa
Ponda KTC Bus Stand: कदंब बसस्‍थानकाला गरज परिसस्‍पर्शाची!

त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी बाजाराची हमी मिळाल्याने त्यांनी शेती उत्पादनावर भर दिला. त्यामुळे फलोत्पादन महामंडळ २०२१-२२ मध्ये २२ टन भाजीपाला बेळगावच्या बाजारात पाठवू शकले.

बाजारपेठेची हमी मिळाल्याने शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून आयते विक्री केंद्र मिळाले. शिवाय सरकारने भाजीपाला पिकांना हमीभाव दिला. या दोन बाबींमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसमोरील मोठ्या समस्या सरकारने सोडविल्या.

त्यामुळे शेतकऱ्यांनी गतवर्षी गवार, भेंडी, दूधी भोपळा, हिरवी मिरची, काकडी, वांगी आणि कारल्याचे अतिरिक्त उत्पादन घेतले ते सर्व बेळगावच्या बाजारात महामंडळाने पाठवल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक चंद्रहांस देसाई यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

एका बाजूला लागवडीखालील क्षेत्र कमी होताना दिसत असताना दुसरीकडे भाजीपाला उत्पादन चांगल्यापद्धतीने शेतकरी घेत आहेत, ही बाब सुखावणारी नक्कीच आहे. गतवर्षी २०२२-२३मध्ये ९५८ हेक्टर क्षेत्र लागवडीतून कमी झाले आहे, ही कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. परंतु भाजीपीक चांगले व्हावे यासाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत,हे स्पष्ट होते.

Vegetables of Goa
Banastari Accident Case: मेघना सावर्डेकरच्या जबान्यांमध्ये तफावत

कोरोना काळात वळले शेतीकडे !

सरकारने २०१५ मध्‍ये बाजार हमीची योजना आणली, त्यानंतर म्हणावा तेवढा प्रतिसाद त्यावेळी मिळाला नाही. परंतु कोरोना काळात व्यवसाय बंद पडल्यानंतर अनेकजण शेतीकडे वळल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातून उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यास बाजाराची व दराची हमी मिळाल्याने अनेकांनी पुढे शेती करणे कायम ठेवले असावे, असा अंदाज बांधता येतो.

फलोत्पादन महामंडळाला भाजीपाला पुरवठा करणाऱ्यामंध्ये राज्यात २०२१-२२ मध्ये ९७० उत्पादक होते, तर त्यांच्याकडे ९२०.२१ मे. टन भाजीपाला उत्पादन झाले. २०२२-२३ मध्ये १११५ उत्पादक झाले, त्यांच्याकडून १ हजार ९१ टन भाजीपाला महामंडळाला मिळाला, त्यामुळे सरकारने २२ हजार ३६० किलोग्रॅम अतिरिक्त भाजी बेळगावच्या बाजारात महामंडळ पाठवू शकले आहे.

बेळगाव बाजारात २०२२-२३ मध्ये पाठविलेला भाजीपाला

  • गवार ५,४०८

  • भेंडी ३,५९१

  • दूधी भोपळा २,८५५

  • हिरवी मिरची ५,१२०

  • काकडी ४,९७०

  • वांगे ३१६

  • कारले १००

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com