Bori News : खेळाच्या मैदानावर शिस्त, जिद्दीचे शिक्षण : सावकर

Bori News : पाणीवाडा बोरी येथील महारुद्र स्पोटर्स आणि कल्चरल क्लबतर्फे कलमामळ येथील क्रीडामैदानावर आयोजत केलेल्या १५ दिवसांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
Bori
Bori Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bori News :

बोरी, खेळाच्या मैदानावर शिस्त, जिद्द, आत्मविश्‍वास आणि आपुलकीने वागण्याचे शिक्षण मिळते प्रशिक्षण घेणाऱ्यांनी कोणत्याही खेळाचे महत्त्व शास्त्रशुध्द शिक्षण घेऊन चांगल्याप्रकारे खेळ खेळून क्रीडाक्षेत्रात आपल्याबरोबर आपल्या गावचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन बोरीचे माजी सरपंच सुनील सावकर यांनी केले.

पाणीवाडा बोरी येथील महारुद्र स्पोटर्स आणि कल्चरल क्लबतर्फे कलमामळ येथील क्रीडामैदानावर आयोजत केलेल्या १५ दिवसांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Bori
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

याप्रसंगी पोलिस निरीक्षक मोहन गावडे, माजी सरपंच मनुराय नाईक, पंचसदस्य विनय पारपती, राजेश बोरकर, कमलाकांत गावडे, विरेंद्र गावडे, महेश गावडे, संदीप गावडे प्रशिक्षक कपिल नाईक मुरली तळेकर हे उपस्थित होते. सावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. कमलाकांत गावडे यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com