Goa Education Department : पुस्तके विकत घ्‍या! शाळा व्यवस्थापनाचा सल्‍ला

मुरगावातील अजब प्रकार : छपाईला विलंब; वितरणास लागणार आठवडा
Books
BooksDainik Gomantak

Goa School : मुरगावातील एका शाळा व्यवस्थापनाकडे ‘माध्यमिक’ची पुस्तके आली नाहीत का, अशी विचारणा करण्यास गेलेल्या पालकांना संबंधित पुस्तके बाहेरून विकत घेण्याचा सल्ला देण्‍यात आला. त्‍यामुळे आश्‍‍चर्य व्‍यक्‍त करण्‍यात येत असून पाचवी ते आठवीपर्यंतची पुस्तके मोफत दिली जात असल्याने खुल्या बाजारात ती उपलब्ध होत नाहीत, हे शाळा व्यवस्थापनाला माहीत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

यंदा शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पुस्‍तके उपलब्‍ध झाली नाहीत. म्‍हणून काही शाळांनी अगोदरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून पुस्तके घेऊन नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना ती दिली असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

Books
Goa Panchyat Byelection : 3 तालुक्यातील 3 पंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम

कोल्हापूरच्या प्रिंटरकडे पाचवी ते आठवीची पुस्तके छपाईसाठी देण्‍यात आली आहेत. तेथे कागदाच्‍या कमतरतेमुळे पुस्‍तक छपाईस विलंब झाला आहे. शिक्षण खात्‍याकडून 30 मेपर्यंत सर्व पुस्तकांची मागणी करण्‍यात आली, परंतु संबंधित कंत्राटदाराने 10 जूनपर्यंत वाढीव मुदत मागितली.

तथापि, दररोज दोन ट्रक पुस्तके गोव्यात येत आहेत. या आठवड्यात सर्व पुस्तकांचे वाटप पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी ‘गोमन्तक''शी बोलताना दिली. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे ७० टक्के वितरण झालेले आहे. उर्वरित ३० टक्के बाकी आहे, असेही ते म्‍हणाले.

Books
Tax Devolution To Goa: गोव्याला 457 कोटी; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

चौकशी होणार

मुरगावात एका ठिकाणी क्रमिक अभ्‍यासक्रमाची पुस्‍तके बाहेरून विकत घेण्याचा पालकांना सल्ला देण्‍यात आला असल्‍याचे प्रकरण आमच्‍यापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात चौकशी करण्‍यात येईल, असे शिक्षण खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

"शालेय पुस्तकांचा विषय या आठवड्यातच निकाली लागेल. विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये, यासाठी पुस्‍तकांच्‍या सॉफ्‍ट कॉपी दीक्षा पोर्टलवर अपलोड केल्‍या आहेत."

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com