Book Publication : युवक आणि नाट्यकला पुराणाचे अतूट नाते सांगणारा ग्रंथ...

या ग्रंथासंबंधी पूर्णानंद च्यारी यांनी ग्रंथ आखणी व स्वरुप स्पष्ट करून नाट्य अभ्यासक तसेच संशोधकाना हा ग्रंथ संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
Book Publication
Book PublicationGomantak Digital Team
Published on: 
Updated on: 

पुराण, इतिहास आणि नाट्यकला यांचे परस्परांशी एक नाते असून हा सुरेख संगम परंपरागत आहे आणि तो मानवी जीवनाशी एकरूप झाला आहे, असे उद्‍गार साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक देविदास कदम यांनी काढले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात ‘अंत्रुज लळीतक-एक नाट्यरंग प्रवास’ या माहितीपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी देविदास कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

हा कार्यक्रम बांदोडा येथील अंत्रुज लळीतक या संस्थेने नुकताच आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक तथा साहित्यिक गुरुदास कामत बांबोळकर, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर, खास अतिथी सरपंच सुखानंद कुर्पासकर, खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

Book Publication
Panaji News : सडलेल्या तांदूळ चौकशीप्रकरणी तिघे कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात

व्यासपीठावरील इतर मान्यवरांत अंत्रुज लळीतक संस्थेचे अध्यक्ष विजयकांत नमशीकर, उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर तसेच ग्रंथाचे संपादक डॉ. पूर्णानंद च्यारी आदींचा समावेश होता. नमशीकर यांनी स्वागत केले, तर बांबोळकर यांनी प्रास्ताविक केले. अंत्रुज लळीतकचे अरुण गावणेकर, राधाकृष्ण बांबोळकर, उमेश नाईक, उदय तिळवे, रामदास कुर्पासकर, विजेता नाईक, दत्ताराम बांबोळकर, गीता बांबोळकर व डॉ. रुपा च्यारी यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. तन्वी बांबोळकर यांनी केले तर संस्थेचे सचिव अरुण गावणेकर यांनी आभार मानले.

Book Publication
Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

माहितीपूर्ण ग्रंथ

कार्यक्रमात देविदास कदम म्हणाले, अंत्रुज लळीतक एक नाट्यरंग प्रवास ग्रंथ माहितीपूर्ण असून युवा वर्गाने तो वाचायला हवा असे नमूद केले. अंत्रुज लळीतक या संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अंत्रुज लळीतकला एक मोठे नाव प्राप्त करून दिल्याने ते गौरवास पात्र असल्याचेही कदम म्हणाले. या ग्रंथासंबंधी पूर्णानंद च्यारी यांनी ग्रंथ आखणी व स्वरुप स्पष्ट करून नाट्य अभ्यासक तसेच संशोधकाना हा ग्रंथ संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Slams Pakistan UN General Assembly
KC Venugopal Goa
Dnyaneshwari Importance in Modern Life
Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com